ETV Bharat / state

पुणे विभागात 88 ‍ठिकाणी क्वॉरंटाईन‍ सुविधा, 12 हजार 850 बेड्स उपलब्ध - म्हैसेकर - पुणे विभागात 88 ‍ठिकाणी क्वॉरंटाईन‍ सुविधा

पुणे विभागातील कोरोना सांसर्गिक एकुण रुग्ण संख्या 104 झाली असून, पुणे जिल्ह्यात- 74, सातारा- 3 सांगली- 25 आणि कोल्हापूर जिल्हयात 2 रुग्ण आहेत. तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 2 हजार 265 होते. त्यापैकी 2 हजार 58 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 207 नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. विभागामध्ये सद्यस्थितीत एकुण 88 ‍ठिकाणी कॉरंटाईन‍ सुविधा निर्माण करण्यात आली असून, या ठिकाणी एकूण 12 हजार 850 बेड्स उपलब्ध आहेत.

Pune region
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
author img

By

Published : Apr 4, 2020, 10:09 PM IST

पुणे - पुणे विभागातील कोरोना सांसर्गिक एकुण रुग्ण संख्या 104 झाली असून, पुणे जिल्ह्यात- 74, सातारा- 3 सांगली- 25 आणि कोल्हापूर जिल्हयात 2 रुग्ण आहेत. तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 2 हजार 265 होते. त्यापैकी 2 हजार 58 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 207 नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 1 हजार 915 नमुने निगेटीव्ह आहेत व 104 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 19 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागामधील 8 हजार 615 प्रवाशांपैकी 3 हजार 977 प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू असून 4 हजार 638 प्रवाशांबाबत पाठपुरावा पूर्ण झाला आहे. आजपर्यंत 16 लाख 33 हजार 970 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्याअंतर्गत 75 लाख 75 हजार 490 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 542 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भात करण्यात आले आहे.

Pune region
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

विभागामध्ये सद्यस्थितीत एकुण 88 ‍ठिकाणी कॉरंटाईन‍ सुविधा निर्माण करण्यात आली असून, या ठिकाणी एकूण 12 हजार 850 बेड्स उपलब्ध आहेत. तसेच 52 ‍ठिकाणी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यात आली असून, या ठिकाणी एकुण 2 हजार 167 बेड्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विभागामध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांकडे सद्यस्थितीत एकुण N95 मास्क 53 हजार 640, ट्रीपल लेअर मास्क -2 लाख 64 हजार 429 उपलब्ध आहेत. तसेच 3 हजार 581-पीपीई कीट, 13 हजार 106- हॅण्ड सॅनिटायझर (500 मिली.), 4 हजार 539- व्हीटीएम कीट व शासकीय रुग्णालयात 137 व्हेंटीलेटरर्स तर खाजगी रुग्णालयात 1 हजार 328 व्हेंटीलेटरर्स उपलब्ध आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.