ETV Bharat / state

Premature Birth Girl Pune: अखेर, ती जगली! सहाव्या महिन्यातच अकाली जन्मलेली शिवन्या ठरू शकते रेकॉर्ड.. - शिवन्या

पुण्यातील वाकड येथे राहणाऱ्या शशिकांत पवार आणि उज्वला पवार यांची मुलगी 'शिवन्या' ही  फक्त 24 व्या आठवड्यात म्हणजेच 6 व्या महिन्यात अवघ्या 400 ग्राम वजनाची जन्मलेली (Punes Shivanya Pawar born in 6th Month). आतापर्यंतची भारतात अकाली जन्माला आलेल्या बाळांमध्ये वय आणि वजन दोन्ही बाबतीत शिवन्या सर्वात लहान ठरली आहे. गरोदरपणापासून ते आतापर्यंत शिवन्याच्या (Premature Birth Girl Shivanya) कुटुंबियांना तब्बल 21 लाख रूपये खर्च आला असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. (Premature Birth Girl Pune)

Premature Birth Girl Shivanya
6 व्या महिन्यातच अकाली जन्मलेली शिवन्या
author img

By

Published : Jan 6, 2023, 11:10 PM IST

Updated : Jan 8, 2023, 8:38 PM IST

शिवन्याचे कुटुंबीय तिच्या जन्माविषयी माहिती देताना

पुणे : 21 व्या शतकात विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे. दरोरोज आपल्याला नवनवीन संशोधन पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यपणे गर्भधारणेनंतर बाळाच्या प्रसुतीचा काळ हा 9 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र, अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव कालावधीपूर्वीच अकाली प्रसूती होऊन आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात जन्म होतो. तेव्हा अशा बाळांना अकाली जन्मलेली बाळ म्हणतात. अकाली जन्मलेले बाळ हे अन्य मुलांप्रमाणे खूप नाजूक असते. तसेच अनेक असे बाळ जास्त दिवस जगत नाही. त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असते. साधारणपणे 7 व्या, 8व्या महिन्यात झालेली अकाली प्रसूतीची अनेक उदाहरणे सापडतात. मात्र, 6 व्या महिन्यात प्रसुती होणे हे दूर्मिळ असते. (Premature Birth Girl Pune)

अकाली जन्मलेली शिवन्या: पुण्यातील वाकड येथे राहणाऱ्या शशिकांत पवार आणि उज्वला पवार यांची मुलगी 'शिवन्या' ही फक्त 24 व्या आठवड्यात म्हणजेच 6 व्या महिन्यात अवघ्या 400 ग्राम वजनाची जन्मलेली (Punes Shivanya Pawar born in 6th Month). तिचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिचा वजन हा दुधाच्या पिशवी पेक्षाही कमी होते. आतापर्यंतची भारतात अकाली जन्माला आलेल्या बाळांमध्ये वय आणि वजन दोन्ही बाबतीत शिवन्या सर्वात लहान (smallest premature baby in india) ठरली आहे.

डॉ. सचिन शहा माहिती देताना

शिवन्याचा 6 व्या महिन्यातच जन्म : शिवन्या हीचा जन्म गेल्या वर्षी 21 मे रोजी झाला, तेव्हा तिच्या आईला प्रसुतीच 6 वा महिना होता. आई उज्वला पवार यांना 3 ऱ्या महिन्यापासूनच पोटात त्रास सुरू झाला होता. तेव्हा त्यांनी चिंचवड येथील स्थानिक दवाखान्यात दाखवले आणि तेथूनच ते औषधोपचार घेऊ लागले. जेव्हा उज्वला पवार यांना 6 वा महिना आला तेव्हा त्यांना खूप त्रास होत होता. आणि जेव्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले तेव्हा शिवन्या हीचा जन्म झाला. गरोदरपणापासून ते आतापर्यंत शिवन्याच्या कुटुंबियांना तब्बल 21 लाख रूपये खर्च आला असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.

शिवन्याची वजनाची कमाल : शिवन्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तीचे 400 ग्राम वजन होते. त्यानंतर सूर्या मदर अँड चाइल्ड केअर रुग्णालय येथे मुख्य निओनॅटोलॉजिस्ट डॉ. सचिन शाह यांच्या अंडर तिला 93 दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. 23 ऑगस्ट रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी तिचे वजन 2130 ग्रॅम इतके होते. अशा बाळांमध्ये जगण्याचा दर 0.5% इतका कमी आहे. गर्भधारणेच्या सामान्य 37-40 आठवड्यांनंतर जन्मलेल्या बाळांचे वजन किमान 2,500 ग्रॅम असते. पण ती आता इतर निरोगी नवजात मुलांसारखीच आहे. आणि तिच्या जन्माच्या 7 व्या महिन्यानंतर तिचे वजन 4.5 किलो आहे आणि तिचे चांगलेपोषण होत आहे.

रूग्णालयातून 93 दिवसानंतर घरी : शिवन्या हिच्या जन्माच्या आधीपासूनच आम्ही सर्वकाही तयारी केली होती. आम्हाला एक मुलगा आहे आणि तो देखील नॉर्मल आहे. पण जेव्हा शिवन्या हिच्या आईला तिसऱ्या महिन्यातच त्रास होता तेव्हापासून आम्ही डॉक्टरांचे सल्ला घेत होतो. आणि जेव्हा शिवन्या हिचा 6 व्या महिन्यात जन्म झाला तेव्हा तर मी दरोरोज डॉ. सचिन शाह यांच्या सूर्या मदर अँड चाइल्ड केअर रुग्णालय येथे कौन्सिलिंग साठी जात होतो. आणि जेव्हा 93 दिवसांनी ती घरी आली तेव्हा आम्ही सर्वजण खूप आनंदीत असून ती नॉर्मल आमच्या बरोबर खेळत आहे. मजा करत आहे. आणि तीच पोषण देखील होत असल्याने आम्हाला खूप आनंद होत असल्याचे शिवन्याच्या आई वडिलांनी सांगितले.

शिवन्या रेकॉर्ड ठरू शकते? 24 आठवड्यात जन्मलेली शिवन्या ही भारतातील अकाली जन्माला आलेल्या बाळांमध्ये सर्वात लहान बाळ आहे. आणि तिची वाढ पाहता प्रतिकूल परिस्थितीत मात करत जगणारी शिवन्या ही एक रेकॉर्ड ठरू शकते. प्रसूती झाल्यानंतर शिवन्याची प्रकृती पहिले सात दिवस क्रिटिकल होती. त्यामध्ये तिने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. पहिला एक ते दीड महिन्यात शिवन्याचे वजन दीड किलो झाले. त्यामुळे तिने क्रिटिकल टप्पा ओलांडला. आता रुग्णालयातून घरी आणल्यानंतर तिला डॉक्टरांनी आईचे दूध, फळे, अप्टामिल दूध पावडर तसेच डाळ खायला देण्यास सांगितले असून, त्याप्रमाणे तिला आहार देण्यात येत असल्याचे पालकांनी सांगितले.

Last Updated : Jan 8, 2023, 8:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.