ETV Bharat / state

पुणे: डॉक्टरांनी हळदीपासून बनवले कोरोनावरील औषध; रोगाचे दुष्परिणाम कमी होण्याचा दावा - कोरोना औषध संशोधन

संशोधन करून तयार केलेल्या औषधाच्या वापराने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होऊ शकतात. तसेच कोरोना आजारामुळे रुग्णाच्या शरीरावर होणारे दुरगामी परिणाम टाळता येऊ शकतात, असा दावा डॉ. किर्ती पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला.

औषधाचे संशोधन करणारे डॉक्टर
औषधाचे संशोधन करणारे डॉक्टर
author img

By

Published : Apr 23, 2021, 9:45 PM IST

बारामती (पुणे) - मागील वर्षभरापासून कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या औषधावर संशोधन केले जात आहे. अशावेळी बारामतीतील डॉ. किर्ती पवार यांनी हळद-काळी मिरीच्या मिश्रणापासून कोरोनावर औषध तयार केले आहे. कोरोना आजारामुळे रुग्णाच्या शरीरावर होणारे दुरगामी परिणाम या औषधाने टळू शकतात, असा दावा डॉ. पवार यांनी केला आहे.

बारामतीच्या डॉक्टरांनी हळद आणि काळी मिरी यांच्या मिश्रणातून कोरोनावरील उपचारासाठी औषध शोधून काढले आहे. या औषधाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. हळदीमध्ये असणारा 'करक्युमीन ' हा पोषक घटक व काळी मिरी यांच्या मिश्रणातून औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. या औषधाच्या वापराने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होऊ शकतात. तसेच कोरोना आजारामुळे रुग्णाच्या शरीरावर होणारे दुरगामी परिणाम टाळता येऊ शकतात, असा दावा डॉ. किर्ती पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला.

डॉक्टरांनी हळदीपासून बनवले कोरोनावरील औषध;
१४० रुग्णांवर केला प्रयोग-डॉ. किर्ती पवार, डॉ. राहूल मस्तूद व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात केलेले संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता प्राप्त जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजीमध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या औषधांबाबत बोलताना कीर्ती पवार म्हणाल्या, की बारामती येथील सार्वजनिक रुग्णालयात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च यांची मान्यता मिळाल्यानंतर करक्युमीन या औषधाची प्रायोगिक चाचणी १४० रुग्णांवर घेण्यात आली. यामध्ये सौम्य लक्षणे, मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा समप्रमाणात सहभाग होता. रुग्णालयात दाखल होताना रुग्णांची शरीरात असलेली ऑक्सिजनची पातळी यावरून कोरोनाबाधित रुग्णांची सौम्य, मध्यम व तीव्र लक्षणांमध्ये विभागणी करण्यात आली. अशा रुग्णांच्या एका समुहाला कोव्हीड टास्क फोर्सने निर्देशित केलेली ओषधे देण्यात आली. तर दुसऱ्या समुहाला कोव्हीड टास्क फोर्सने निर्देशित औषधांसोबत करक्युमीन ५२५ एमजी व बायोपेरीन 2.5 एमजी म्हणजे हळद व काळी मिरी यांचे योग्य मिश्रण असलेले हे औषध दिवसातून दोन वेळा देण्यात आले.हेही वाचा-कोविड-१९ नोसोड्स : कोविड प्रतिबंधक लसीचेच सर्व गुण असलेले होमिओपथीद्वारे विकसित उपयुक्त औषध

डॉ. किर्ती पवार, डॉ. राहूल मस्तूद , डॉ. सतीश पवार, सम्राज्ञी पवार, डॉ. रमेश भोईटे , डॉ. राहुल भोईटे, डॉ. मीनल कुलकर्णी व संख्याशास्त्रज्ञ आदिती देशपांडे या टीमने संशोधनात सहभाग घेतला आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनामुळे भारतासह जगभरातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मदत होणार आहे. शिवाय वैद्यकीय यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच करक्युमीन व बायोपेरीन याचे मिश्रण असलेली गोळी युएसएफडीए मान्यताप्राप्त आहे. कोव्हीड होऊ नये म्हणून ही रोज एक गोळी घेतल्यास त्याचा प्रतिबंधात्मक उपयोग होऊ शकत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

हेही वाचा-'सरकारशिवाय कोणालाही रेमडेसिवीर खरेदीचा अधिकार नाही'

संशोधनाचा निष्कर्ष-

  • करक्युमीन व बायोपेरीन याचे मिश्रणयुक्त गोळ्या दिलेल्या रुग्णांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे ही लक्षणे कमी होऊन रुग्ण लवकर बरे झाले.
  • हे औषध दिलेल्या रुग्णांमधील गंभीरतेचे प्रमाण खूप कमी झाले.
  • हे औषध न दिलेल्या रुग्णांचा बरा होण्याचा कालावधी ७ ते २७ दिवस होता.तर करक्युमीन घेतलेल्या रुग्णांचा ५ ते १० दिवस होता.
  • करक्युमीन घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची गरज कमी भासली.
  • मध्यम व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांमधील मृत्युदर कमी झाला.
  • या हळदीच्या गोळीमुळे रक्त न गोठता प्रवाही राहण्यास मदत झाल्यामुळे कोव्हीडमुळे फुफ्फुसावर होणारे दुष्परिणाम, ह्रदयाच्या, फुफ्फुसाच्या व
    शरीरातील रक्तवाहिन्यांमध्यें होणाऱ्या गुठळ्या, असे घातक दुष्परिणाम टाळण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली.
  • कोरोना होऊन गेल्यावरही पुढील ३ महिने या गोळीचा मर्यादित स्वरूपात वापर करून कोरोनामुळे होणारे दुरगामी परिणाम टाळण्यासाठी मदत होऊ शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.