ETV Bharat / state

प्रियकराच्या मदतीने पतीला नपुंसक करण्याचा आखला डाव, पुढे काय झालं वाचा.... - woman tries to turn husband impotent

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला नपुसंक बनवायचा प्लॅन आखला होता. मात्र या प्लॅनचा सुगावा लागताच पतीने पोलिसात धाव घेतली. ही घटना पुण्यातील वारजे माळवाडी येथे घडली.

pune wife booked for planning to turn husband impotent with help of her lover
प्रियकराच्या मदतीने पतीला नपुंसक करण्याचा आखला डाव, पुढे काय झालं वाचा....
author img

By

Published : Oct 27, 2020, 11:20 AM IST

Updated : Oct 27, 2020, 1:03 PM IST

पुणे - पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला नपुसंक बनवायची योजना आखली होती. मात्र याचा सुगावा लागताच पतीने पोलिसात धाव घेतली. ही घटना पुण्यातील वारजे माळवाडी येथे घडली. विशेष म्हणजे दोघेही आरोपी मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. या प्रकरणी पत्नी व तिचा प्रियकर यांच्यावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रवी व सोनल (नावे बदलली आहेत) यांचा विवाह मार्च महिन्यात झाला आहे. रवी हा सॉफ्टवेअर इंजिनिअर तर सोनल ही मेकॅनिकल इंजिनिअर आहे. सोनलचे विवाहापूर्वीपासून विवेक बरोबर प्रेमसंबंध होते. विवाहानंतर त्यांनी एकमेकांना भेटायचे नाही, असे ठरवले होते. मात्र ते दोघेही एकाच कंपनीत असल्याने त्यांचे प्रेमसंबंध पुन्हा जुळले.

विवेक हा नेहमी त्यांच्या राहत्या घराबाहेर फेऱ्या मारताना रवीला दिसत होता. पत्नी सोनलने महाबळेश्‍वरला जायचे नियोजन केल्यावर दोघेही महाबळेश्‍वरला गेले होते. तिथेही विवेक हा रवीला त्यांच्या अवती-भोवती फिरताना दिसत होता. यामुळे रवीला त्यांच्याबद्दल संशय निर्माण झाला होता.

असा लागला सुगावा, नाहीतर...

संशय निर्माण झाल्यामुळे रवीने त्याने पत्नी सोनलच्या मोबाईलची पडताळणी केली तर त्याला विवेक आणि पत्नी सोनल यांच्यामध्ये झालेले चॅट सापडले. यामध्ये रवीच्या खासगी भागाची नस कापून त्याला नपुसंक बनवण्याचा योजनेची चर्चा आढळली. या योजनेची ते महाबळेश्‍वरमध्येच अंमलबजावणी करणार होते. मात्र, त्यांच्या कटाचा सुगावा लागल्याने रवीने तिथून काढता पाय घेत थेट पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा - ई टीव्ही भारत विशेष : मुंबईत सप्टेंबर महिन्यात खून, विनयभंग, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ

हेही वाचा - काही अटींसह मुंबईतील जिम आणि फिटनेस सेंटर्सना पुन्हा सुरुवात

Last Updated : Oct 27, 2020, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.