पुणे - पुण्यातील विश्रांतवाडी भागात असणाऱ्या शांतीनगर येथे आकाश अशोक क्षीरसागर (वय 24, रा. शांतीनगर, येरवडा, पुणे) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ( Youth Drowned in Mutha River ) आहे. तो आपल्या दोन मित्रासोबत मुठा नदी पात्रात पोहत होता. आकाशला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला - पुण्यातील विश्रांतवाडी भागात शांतीनगर येथे एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे. हा युवक मित्र सोबत पोहोण्यासाठी केला होता आकाश शिरसागर असे या मुलाचे नाव आहे. आकाश हा आपल्या मित्रासोबत होण्यासाठी गेला होता, परंतु आकाशला पोहोता येत नसल्यामुळे त्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. काल दुपारी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. तेव्हा त्याच्या मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने अग्निशामक दल व पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीच्या बाहेर काढण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - Pune Crime News : 'मौसम मस्ताना' म्हणत वकिलाने मागितला ज्युनियरला किस