ETV Bharat / state

पुणे : 18 वर्षांवरील व्यक्तीच्या लसीकरणाला 1 मे पासून सुरुवात - Corona vaccination starts from May 1 in Pune

1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना देखील कोरोना लस मिळणार असल्याची घोषणा केंद्राने केली होती. त्यानुसार आता 1 मे पासून, पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील 18 वर्षे ते 44 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

आयुष प्रसाद
आयुष प्रसाद
author img

By

Published : Apr 30, 2021, 9:51 PM IST

पुणे - 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना देखील कोरोना लस मिळणार असल्याची घोषणा केंद्राने केली होती. त्यानुसार आता 1 मे पासून, पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील 18 वर्षे ते 44 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 14 ठिकाणी 1 मे ते 7 मे या कालावधीमध्ये लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, परंतु या कालावधीमध्ये जिल्ह्यामधील सर्वच लसीकरण केंद्रांवरती लसीकरण होणार नसून, प्रत्येक तालुक्यातील एक व पुणे कटक मंडल अशा एकूण 14 ठिकाणी लसीकरण होणार आहे. मात्र लसीकरणासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक असून, फक्त 100 जणांनाच लस देण्यात येणार आहे. दरम्यान लाभार्थ्यांनी नोंदणी केंद्रांवर गर्दी न करता ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले आहे.

18 वर्षांवरील व्यक्तीच्या लसीकरणाला 1 मे पासून सुरुवात

या केंद्रांवर होणार लसीकरण

आंबेगाव उपजिल्हा रुग्णालय मंचर

बारामती महिला रुग्णालय बारामती

भोर उपजिल्हा रुग्णालय भोर

दौंड उपजिल्हा रुग्णालय दौंड

हवेली प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर

इंदापूर प्राथमिक आरोग्य केंद्र पळसदेव

जुन्नर प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर

खेड प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगर

मावळ प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे

मुळशी प्राथमिक आरोग्य केंद्र मान

पुरंदर ग्रामीण रुग्णालय जेजुरी

शिरूर ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर

वेल्हा ग्रामीण रुग्णालय वेल्हा

पुणे कटक मंडल सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय

हेही वाचा - कॅन्सरग्रस्त चार वर्षीय 'परी'ने जिंकली कोरोना विरुद्धची लढाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.