ETV Bharat / state

जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध

author img

By

Published : Dec 17, 2019, 9:26 AM IST

दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याच्या मागणीकरता आंदोलन करणाऱ्या जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी निषेध सभा आयोजित करून आंदोलन केले.

pune
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पुणे विद्यापीठात आंदोलन

पुणे - दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात आला. हा निषेध व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोमवारी विद्यापीठातच आंदोलन केले.

दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करत आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले, पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला आणि यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधातील आंदोलन पुण्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी निषेध सभा आयोजित करून आंदोलन केले. या आंदोलनात युवक काँग्रेस एनएसयूआई, युक्रांद, भारती विद्यार्थी मोर्चा या संघटनाही सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा - पुण्यातील कोंढव्यात सात मजली इमारतीला भीषण आग

यावेळी बोलताना आंदोलक विद्यार्थी सतीश गोऱ्हे म्हणाला, नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केले आहे. हा कायदा हिंदू मुस्लिमांमध्ये दुफळी निर्माण करणारा आहे. विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करून हा विषय सरकारविरुद्ध विद्यार्थी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु आम्ही तो होऊ देणार नाही. आज देशभरात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. 18 तारखेला पुणे विद्यापीठात मशाल रॅली काढून निषेध नोंदवणार असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

या आंदोलनात जामिया विद्यापिठातले माजी विद्यार्थीही सहभागी झाले होते. यावेळी मोदी आणि शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'युद्ध नको बूद्ध हवा' असे फलकही झळकवण्यात आले. नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा - कुस्तीप्रेमींसाठी खुशखबर..! ६३ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा पुण्यात

Intro:Pune:-
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधातील आंदोलन पुण्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे. दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापिठात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी निषेध सभा आयोजित करुन आंदोलन केलं. या आंदोलनात युवक काँग्रेस एनएसयूआई, युक्रांद, भारती विद्यार्थी मोर्चा या संघटनाही सहभागी झाल्या होत्या.

या आंदोलनात जामिया विद्यापिठातले माजी विद्यार्थीही सहभागी झाले. यावेळी मोदी आणि शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. युद्ध नको बूद्ध हवा असे फलकही झळकवण्यात आले. नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.Body:...Conclusion:...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.