ETV Bharat / state

पुणे शहरात कोरोना सॅम्पल टेस्टिंगचे प्रमाण वाढले

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मृत पावलेल्या एकूण व्यक्तींपैकी साधारणपणे 80 टक्के व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहेत. शिवाय यातील बहुतांशी व्यक्तींना मधुमेह व उच्च रक्तदाब हा विकार दिसून आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे शहरात कोरोना सॅम्पल टेस्टिंगचे प्रमाण वाढले
पुणे शहरात कोरोना सॅम्पल टेस्टिंगचे प्रमाण वाढले
author img

By

Published : Apr 9, 2020, 9:55 PM IST

पुणे - शहरात कोविड-19 रुग्णांची संख्या वाढत आहे. ही वस्तुस्थिती असली तरी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या एकूण सॅम्पलपैकी साधारण 3.9 टक्के केसेस पॉझिटिव्ह तर साधारण 89 टक्के केसेस निगेटिव्ह आहेत. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मृत पावलेल्या एकूण व्यक्तींपैकी साधारणपणे 80 टक्के व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहेत. शिवाय यातील बहुतांशी व्यक्तींना मधुमेह व उच्च रक्तदाब हा विकार दिसून आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे शहरात कोरोना सॅम्पल टेस्टिंगचे प्रमाण वाढले
पुणे शहरात कोरोना सॅम्पल टेस्टिंगचे प्रमाण वाढले

5 ते 31 मार्च या कालावधीत 1 हजार 235 चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यापैकी 48 सॅम्पल पॉझिटिव्ह तर 1 हजार 110 सॅम्पल निगेटिव्ह आले आहेत. म्हणजे तपासणी करण्यात आलेल्या एकूण सॅम्पलपैकी साधारण 3.9 टक्के सॅम्पल पॉझिटिव्ह तर 89 टक्के सॅम्पल निगेटिव्ह आले आहेत.

मार्च महिन्याच्या तुलनेत 1 एप्रिल ते 8 एप्रिल यादरम्यान साधारणपणे चार पट जास्त सॅम्पलची तपासणी करण्यात आली आहे. या कालावधीत पॉझिटिव्ह केसेसची संख्या ही झपाटयाने वाढल्याचे दिसून येते. तपासणीदरम्यान पॉझिटिव्ह केसेस जास्त आढळून आल्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.