ETV Bharat / state

Pune Student attack: विद्यार्थिनीवरील हल्ल्यानंतर तीन पोलीस कर्मचारी निलंबित, 'ती' मोठी चूक भोवली!

पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यावेळी पेरुगेट पोलीस स्टेशनमध्ये एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे पोलिस हवालदारासह तिघेजणांना निलंबित करण्यात आले होते.

Police Constable Suspended
निलंबित
author img

By

Published : Jun 29, 2023, 8:59 AM IST

पुणे : दोन दिवसापूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत दिवसा हातात कोयता घेऊन मुलीच्या मागे धावत एका तरुणाने त्या तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेच्या वेळेस दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता त्या कोयता घेऊन हल्ला करणाऱ्या तरुणाला पकडले. तेव्हा जवळच असलेल्या पेरुगेट पोलीस स्टेशनमध्ये एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. स्थानिकांनी फोन केल्यावर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. या घटनेने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. आत्ता या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाणे अंतर्गत पेरूगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

तीन कर्मचारी निलंबित : विश्रामबाग पोलिस ठाणे अंतर्गत पेरूगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिली.

एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला : महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठ एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी पुण्यात घडली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरू गेट पोलीस चौकीपासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडला. प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले. शंतनु लक्ष्मण जाधव (वय २२ रा मुळशी डोंगरगाव नारळीकर इन्स्टिट्यूट समोर) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणाची दखल घेत शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी बुधवारी पोलीस आयुक्तांची भेट घेत शहरातील कायदा सुव्यस्थेबाबत निवेदन दिले आहे.

हेही वाचा :

  1. Pune Crime News: पुण्यात दर्शना पवार हत्येची पुनरावृत्ती टळली, एकतर्फी प्रेमातून तरुणीवर केला कोयत्याने हल्ला, पहा सीसीटिव्ही
  2. MLA Geeta Jain : आमदार गीता जैन यांनी मनपा अभियंत्याच्या लगावली कानशिलात, निलंबित करण्यासाठी दिले पत्र
  3. Nashik Crime News : मालेगावमध्ये करियर मार्गदर्शनातून धर्मप्रसाराचा आरोप; महाविद्यालयाचे प्राचार्य निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.