ETV Bharat / state

"सातवा वेतन आयोग लागू करा, कोविड योद्ध्यांचा सन्मान करा"; पुण्यातील 'ससून'चे डॉक्टर सामूहिक रजेवर - ससून रुग्णालयातील डॉक्टर सामूहिक रजेवर

सातवा वेतन आयोग लागू करावा आणि कोरोना योद्धा डॉक्टरांचा सन्मान करावा, यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि प्राध्यापक हे मागील सहा महिन्यांपासून प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत आहेत. मात्र, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने सर्व डॉक्टर आजपासून सामूहिक रजेवर गेले आहेत.

ससून
ससून
author img

By

Published : Nov 2, 2020, 12:12 PM IST

पुणे - ससून रुग्णालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांनी आजपासून संप पुकारला आहे. सर्व डॉक्टर आजपासून सामूहिक रजेवर गेले आहेत. सातवा वेतन आयोग लागू व्हावा, कोरोना योद्धा डॉक्टरांचा सन्मान व्हावा, अस्थायी प्राध्यापकांना नियमित करावे, या मागण्यांसाठी डॉक्टर संपावर गेले आहेत.

सातवा वेतन आयोग लागू करावा आणि कोरोना योद्धा डॉक्टरांचा सन्मान करावा, यासाठी डॉक्टर आणि प्राध्यापक हे मागील सहा महिन्यांपासून प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत आहेत. पण त्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ससून रुग्णालयातील डॉक्टर संपावर

आमच्यापैकी बरेच सहाय्यक प्राध्यापक मागील अनेक दिवसांपासून ससून रुग्णालयात रुग्णसेवा करीत आहेत. कोरोना महामारीच्या काळात या डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवेला प्राधान्य दिले आहे. आणि हे डॉक्टर अजूनही अस्थायी स्वरूपामध्ये काम करत आहेत. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार, असे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकुमार साळुंखे म्हणाले.

मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन -

आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आणि कायमस्वरूपी कामावर घेण्याची आश्वासने दिली गेली. मात्र, आतापर्यंत या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. यासंदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. परंतु अजूनही आमच्या मागण्यांची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्हाला आज हे पाऊल उचलावे लागले. आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आमचे हे कामबंद आंदोलन असेच सुरू राहणार आहे, असेही ते म्हणाले.

रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता -

ससून रुग्णालय हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि सर्वाधिक रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. संपूर्ण पुणे जिल्ह्यासह इतर भागांतूनही या रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण येत असतात. सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांच्या या कामबंद आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या डॉक्टरांचे हे आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासन नेमक्या काय उपाययोजना करते, हे पहावे लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.