ETV Bharat / state

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून तब्बल 1 कोटी 3 लाख रुपयांची चरस जप्त, दोघे ताब्यात

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांसाठी विविध शहरात वितरीत करण्यात येणारा तब्बल 1 कोटी 3 लाख रुपयांची चरस पुणे लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अटक आरोपीसह पोलीस पथक
अटक आरोपीसह पोलीस पथक
author img

By

Published : Dec 21, 2020, 5:31 PM IST

Updated : Dec 21, 2020, 9:19 PM IST

पुणे - नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा वापर होण्याची शक्यता गृहीत धरून या पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे लोहमार्ग पोलिसांमार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत तब्बल 34 किलो 400 चरस पोलिसांनी हस्तगत केले.

माहिती देताना पोलीस अधीक्षक

दिल्लीहून येणाऱ्या रेल्वेंवर सात दिवसांपासून नजर

लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांचे बॅचमेट असलेल्या हिमाचल प्रदेशातील एका पोलीस अधिकाऱ्याने पुणे शहरात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांची चार पथके सतत सात दिवस दिल्लीहून येणाऱ्या सर्वे रेल्वे गाड्यांवर करडी नजर ठेवून होते.

वाडिया पुलाखाली रचला होता सापळा

शनिवारी (19 डिसेंबर) पुणे रेल्वे स्थानक परिसरातील वाडिया पुलाखाली दोन व्यक्ती अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तीन वेगवेगळ्या पथकाच्या मदतीने त्याठिकाणी सापळा रचला होता. यादरम्यान रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी आलेल्या दोन व्यक्तीना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अंगझडतीत सापडले 34 किलो 400 ग्रॅम चरस

ललित कुमार दयानंद शर्मा (वय 49 वर्षे), कैलाससिंग रुपसिंग सिंग (वय 40 वर्षे, दोघे रा. हिमाचल प्रदेश) या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेत 34 किलो 400 ग्रॅम चरस सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 1 कोटी 3 लाख रुपये इतकी आहे.

मुंबई, गोवा, बंगळुरु अन् पुण्यात होणार होती विक्री

पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता जप्त केलेल्या चरसमधील 22 किलो चरस मुंबई, 5 किलो गोवा, 5 किलो बंगळुरु आणि 2 किलो पुणे शहरात वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या आसपास असणाऱ्या हॉटेलमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये या चरसचा वापर होणार होता.

हेही वाचा - प्रतिकुल परिस्थितीवर मात करत पुणेकर तरुण लष्करात झाला लेफ्टनंट

हेही वाचा - धक्कादायक..! एक फोटो पाहून केले कॅन्सरचे निदान; उपचाराच्या बहाण्याने महिलेला घातला दीड कोटींचा गंडा!

Last Updated : Dec 21, 2020, 9:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.