पुणे: शहरात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच घटनांमध्ये कोयताच्या वापर दिसून येत. त्यामुळे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार सध्या शहरात जी पण कोयत्याची दुकाने आहे. त्या दुकानावर कोयता विक्री करण्यापूर्वी ज्याला कोयता घ्यायचा आहे त्या व्यक्तीला आपला आधार कार्ड द्यावे लागणार आहे. यात कोणी विकत कोयता घेतला याची माहिती पोलिसांना असणार आहे. कारण मोठ्या प्रमाणावर शहरात असलेल्या गुन्ह्यात कोयत्याचा वापर दिसून येत आहे. आता पुणे पोलिसांच्या वतीने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
कोयता विक्रेत्यांना नोटीस: शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत माजवली आहे. यावर कडक पाऊल म्हणून पुणे पोलिसांच्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यात अनेक गुन्हेगारांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. आत्ता यात पुढचं पाऊल म्हणून पुणे पोलिसांच्या वतीने शहरातील कोयता विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्येक कोयता विक्री खरेदी करणाऱ्याला आत्ता आधार कार्ड द्यावे लागणार आहे.
विधीसंघर्षित बालक पळवून गेले: कालच पुण्यातील येरवडा येथे असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहात या सातही विधीसंघर्ष बालकांना काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या गुन्हा प्रकरणात ठेवण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्री 11 ते 12 च्या सुमारास सुधारगृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून हे विधीसंघर्षित बालक पळवून गेले होते. सुधारगृह तोडून खतरनाक विधीसंघर्ष बालक पळाल्याने शहरात एकच खळबळ आहे.
कोयता टोळीची मोठी दहशत : पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता टोळीने मोठी दहशत माजवली होती. पोलीस सातत्याने कोयता टोळीवर कारवाई करत असताना पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारक सुधारगृहामध्ये सात विधीसंघर्ष बालक पळून गेल्याने मोठी खळबळ उडाली होती. हे सातही विधीसंघर्ष बालक कोयता टोळीचे सदस्य असल्याचे प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे शहरांमध्ये पुन्हा कोयता टोळीची दहशत निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Pune koyta Gang येरवडा बालसुधरगृहातून कोयता टोळी फरार शिडी लावून पळाली सात अल्पवयीन मुले