पुणे- शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे पोलिसांनीही पुन्हा एकदा नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केलीय. निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रतिबंधित आणि इतर ठिकाणी सातत्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहून पोलिसांना ही कारवाई कारवाई लागली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी ठीक ठिकाणी नाकाबंदी करून कारवाई केली. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 1 हजार 16 जणांवर कारवाई करण्यात आली.यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या 102 जणांचा समावेश आहे.
संचारबंदीचा कालावधी रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत आहे. या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईसाठी पुणे शहरात 94 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलीय. या कारवाईसाठी 85 अधिकारी आणि 337 कर्मचारी तैनात करण्यात आले. विनापरवानगी संचार करणाऱ्या व्यक्तींवर 69 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. तर विना मास्क 102 मोकाट फिरणाऱ्यावर कारवाई केली गेली. रात्री ते पहाटे संचार बंदीच्या काळात फिरणाऱ्या 97 नागरिकांवर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी कलम188 चेअंतर्गत 184 नागरिकांवर कारवाई केली. या दरम्यान 108 वाहने जप्त करण्यात आली, ट्रिपल सीट फिरणाऱ्यां 131 जणांवर, सिग्नाल जम्पिंग 110, रॉंग साईड 57, फुटपाथवर गाड्या चालवलयाप्रकरणी 31 जणांवर कारवाई करण्यात आली. बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या 57 जणांवर कारवाई केली आहे.