पुणे - शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी काल रात्री चार तास 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवून सराईत गुन्हेगारांची 'कुंडली' तपासली. त्यामध्ये तब्बल १ हजार १७४ गुन्हेगार मिळून आले आहेत. 'आर्म अॅक्ट'नुसार पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून दोन गावठी पिस्तूल, ९ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याशिवाय शहरभरात विविध पोलीस ठाण्यातंर्गत २५० आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४० कोयते, ५ तलवारी, १ कुकरी, २ पालघन, १ सुरा असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांविरोधात 'कोंम्बिग ऑपरेशन'; 250 हुन अधिक अटकेत, मोठा शस्त्रसाठा जप्त
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरांतर्गत गुन्हेगारांची झाडाझाडती घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी काल रात्री नऊ ते एक वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविले. एकाचवेळी करण्यात आलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांची पळता भुई थोडी झाली.