ETV Bharat / state

Pune Police Arrested Terrorist : पोलीस पकडायला गेले बांगलादेशी नागरिक, निघाला बॉम्बस्फोटातील दहशतवादी; पुण्यात बनवलं बनावट पारपत्र

Pune Police Arrested Terrorist : पुण्यात बांगलादेशी नागरिक अवैधपणे पाहत असल्यानं पुणे पोलिसांनी कारवाई केली. मात्र पकडण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये बांगलादेशातील एका बॉम्बस्फोटातील दहशतवादी आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Police Arrested Terrorist
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 11:04 AM IST

पुणे Pune Police Arrested Terrorist : बांगलादेशातील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कमरुल मंडल असं पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. जामिनावर बाहेर पडल्यानंतर त्यानं भारतात घुसखोरी केली होती. एका दलालाला हाताशी धरुन या दहशतवाद्यानं पुण्यातून पारपत्र मिळविल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. कमरुल मंडल याच्यासह सहा बांगलादेशी घुसखोरांना न्यायालयानं 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दहशतवाद्यानं पुण्यात बनवलं पारपत्र : बांगलादेशात बॉम्बस्फोट घडवल्यानं कमरुल मंडल हा कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यानं बांगलादेशमधून भारतात घुसखोरी केली. पुण्यात येऊन त्यानं एका दलालामार्फत भारतातलं पासपोर्ट बनवलं होतं अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा पुणे पोलीस यांच्या मदतीनं याचा तपास सुरू करण्यात आलेला आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत कमरुल मंडल याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लष्कराची गुप्तचर यंत्रणा, तसेच हडपसर पोलिसांनी कमरुल मंडल याच्यासह सहा बांगलादेशी घुसखोरांना पुण्यातील हडपसर भागातून अटक केली होती.

अशी उघडकीस आली घटना : हडपसर पोलीस स्टेशन आणि लष्कराची गुप्तचर यंत्रणेनं पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट जप्त करण्यात आलं होतं. ज्या व्यक्तीने व्यक्तीनं त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच पासपोर्ट बनवण्यासाठी मदत केली, त्या दलालाचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी त्याच्याकडून सगळे कागदपत्र ताब्यात घेतले आहेत. त्यातला एक आरोपी हा बांगलादेश मधल्या बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी आहे.

बांगलादेशात पाठवत होता पैसे : अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांचं पश्चिम बंगालमधील एका बँकेत खातं होतं. या खात्यातून ते बांगलादेशात पैसे पाठवत होते. बांगलादेशी दहशतवादी कमरुल मंडलनं बांगलादेशात बॉम्बस्फोट घडवला होता. त्याला अटकही करण्यात आली होती. तिथल्या न्यायालयाकडून त्याला जामीन मिळवल्यानंतर तो कारागृहातून बाहेर आला. त्यानं भारतात बेकायदा प्रवेश केला. त्यानं भारतीय पारपत्रही बनवल्याचं या कारवाईत उघड झालं. याप्रकरणाचा कसून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.

हेही वाचा :

  1. Terrorist Shahnawaz Arrested : पुणे बॉम्बस्फोट प्रकरणातील वॉन्टेड दहशतवाद्याला दिल्लीतून अटक
  2. Pune Terrorist News: पुण्यात पकडलेल्या 'त्या' दहशतवाद्यांचा प्रमुख झुल्फिकार अली बडोदावाला आता पुणे एटीएसच्या ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.