ETV Bharat / state

Pune Crime : सुजीत वर्मा टोळीचा सदस्य राजकिरण अखेर गजाआड; तांत्रिक पद्धतीने शोध घेत साताऱ्यातून केली अटक

पुणे शहरात आगामी दिवसांमध्ये होऊ घातलेल्या आंतराष्ट्रीय जी-२० परिषद, त्याचप्रमाणे प्रजासस्ताक दिनानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पुणे शहर पोलिसांकडून शहरभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाईत गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाकडून सुजीत वर्मा टोळीचा सदस्य राजकिरण उर्फ ओमस्या गणेश भंडारी याला मेढा सातारा येथून अटक करण्यात आली आहे.

Pune Crime
आरोपीला अटक
author img

By

Published : Jan 16, 2023, 5:27 PM IST

पुणे : राजकिरण ऊर्फ ओमस्या गणेश भंडारी (वय 22 वर्षे, रा. 11 नंबर गल्ली, जय भवानी काॅलनी, गंगानगर, फुरसुंगी हडपसर पुणे) हा सुजित वर्मा गॅंगचा दुसऱ्या फळीतील सदस्य आहे. तो बिट्या कुचेकर या फरारी आरोपीसोबत टार्गेट ठरविणे, अल्पवयीन मुलांची निवड करणे आणि त्यांना हत्यार पुरविण्याचे काम करायचा. त्याच्या गुन्ह्यांंमुळे तो अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर आला होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

असा घेतला आरोपीचा मागोवा : पुणे पोलिसांकडून ओमस्या भंडारी याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला जात असताना तो नाझिरे (तालुका मेढा, जिल्हा सातारा) या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. यानंतर युनिट 6 कडील पथक पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलीस अंमलदार लाहिगुडे आणि पोलीस अंमलदार ताकवणे, पोलीस अंमलदार व्यवहारे यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला. येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी राजकिरणला गुन्हे शाखा युनिट 6च्या ऑफिसमध्ये आणल्यानंतर त्याची सखोल चौकशी सुरू केली. दरम्यान तो सुजित वर्मा गॅंगच्या दुसऱ्या फळीचा सदस्य असल्याचे कळले. तो अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचेही चौकशीत समोर आले.

आरोपीविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद : आरोपी राजकिरणच्या अटकेमुळे सुजित वर्मा गॅंगच्या पुढील कारवायांना आळा बसेल, अशी अपेक्षा पुणे क्राईम ब्रँचकडून व्यक्त करण्यात आली आहे. आरोपीच्या सखोल चौकशीनंतर त्याला पुढील कारवाईसाठी हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तो सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गंभीर स्वरूपाचे एकूण 4 गुन्हे दाखल आहेत.

पोलिसगिरीसमोर गुंडगिरी फेल : पुणे शहरात विविध ठिकाणी कोयता गँगने दहशत माजवली आहे. पुण्यातील सिंहगड कॅम्पस येथे दहशत माजवणाऱ्या दोन जणांना अटक करून त्यांची वरात काढलेली घटना ताजी असताना पुण्यातील नाना पेठ येथे कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या 5 जणांच्या समर्थ पोलिसांनी 4 जानेवरी रोजी अटक केली होती. १ जानेवारी २०२३ च्या पहाटे काही इसमांची आपसात भांडणे झाली होती. त्या भांडणाचा राग मनात धरून काही सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन नवावाडा भागात दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ याची दखल घेत आरोपींना अटक केली होती. या आरोपींच्या दहशतीची नागरिकांनी न घाबरता पोलिसांना माहिती द्यावी. त्यावर पुणे पोलीस कोणत्याही गुन्हेगारांची गय न करता नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी केले होते. ही प्रकरणे घडली असताना आता हा गुन्हेगार हाती लागल्याने पोलीस कारवाईला धार आली आहे असे दिसते.

हेही वाचा: Pune Gangsters Arrested कोयत्याने दहशत माजविणाऱ्या सराईतांच्या आवळल्या मुसक्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.