ETV Bharat / state

Cyber Fraud In Pune: युट्यूबवरुन दिले शेअर मार्केटचे धडे, लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीला राजस्थानहून अटक - Pune News

पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुणे सायबर पोलीसांनी शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपीला राजस्थानहून अटक केली आहे.

Pune News
आरोपीला राजस्थानहून अटक
author img

By

Published : May 17, 2023, 9:01 PM IST

Updated : May 17, 2023, 9:50 PM IST

माहिती देताना अनिल डफळ

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वेगवेगळ्या शकली लावून नागरिकांना हजारो रुपयांची फसवणूक सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून होत आहे. या प्रकरणी सायबर पोलीसांनी मिलन जिनेंद्र जैन रा. केदलगंज वर्कशॉप, अल्वर राजस्थान येथून अटक केली आहे. आरोपीला कोर्टामध्ये हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 22 मे पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली असून, अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक अनिल डफळ हे करत आहेत.

युटयूब चॅनलवर दिली माहिती: याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण जग करोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीमध्ये असताना, पैसे कमविण्यासाठी घरबसल्या शेअरमार्केटमध्ये पैसे लावून त्याद्वारे पैसे कमविण्याकडे सर्वसामान्य जनतेचा जास्त कल झाला होता. याच गोष्ठीचा फायदा घेवून राजस्थानमधील सायबर गुन्हयांची पंढरी समजल्या जाणा-या अलवर जिल्हामधील आरोपी मिलन जिनेंद्र जैन याने, सन २०२० मध्ये शेअर मार्केटबाबत युटयूब चॅनल चालू केले. त्याद्वारे सुरवातील सर्वसामान्य लोकांना शेअरमार्केटचे धडे देवून व शेअर मार्केटमध्ये पैसा कसा कमवायचा याबाबत सांगून त्याचे सबस्क्रायबर वाढविले.

चॅनलवर ४० हजार सबस्क्रायबर: आरोपी मिलन जैन याचे तब्बल ४० हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर, लोकांना शेअरमार्केटमध्ये त्याची कंपनी ट्रेडिंग विंथ ए प्रो या कंपनीच्या माध्यमातून त्याच्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठया प्रमाणात नफा मिळवून देतो असे सांगून, पुण्यामधील गुंतवणूकदार याची सुमारे २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. सिंहगड रोड येथे राहणारे रणवीर राजेंद्र जाधव यांची फसवणूक झाल्याबाबत सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नोद करण्यात आला होता.

सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. नागरिकांनी सावध राहले पाहिजे, जर अशाप्रकारे फसवणूक झाल्यास सायबर पोलीसांकडे संर्पक साधावा - पोलीस उपनिरिक्षक अनिल डफळ

शेअर मार्केटमध्ये तोटा: फिर्यादी यांनी आरोपीचे युटयूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्यांचे मोबाईलवरून संपर्क केला. सुरुवातीला काही रक्कम गुंतवल्यानंतर चांगला परतावा देवून, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीकडे वेळोवेळी तब्बल २५ लाख रुपये ट्रेडिंग विथ ए प्रो या कंपनीच्या अ‍ॅक्सीस बँकेच्या खात्यावर पाठवून गुंतवणूक केली. त्यानंतर काही दिवसांनी शेअर मार्केटमध्ये तोटा झाला आहे, असे सांगून आरोपीने फिर्यादी यांची फसवणूक केली.

लाखो रुपयांची फसवणूक: आरोपीने फिर्यादी यांचेबरोबर महाराष्ट्रसह इतर राज्यातील लोकांची देखील लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपी मिलन जैन याचे विरुध्द रबाळे पोलीस ठाणे नवी मुंबई येथे देखील फसवणूकीचा व एमपीआयडी कायदा अन्वये गुन्हा नोंद असून, रबाळे पोलीसांनी आरोपीला राजस्थान येथून अटक केली होती. आरोपी हा पुणे सायबर पोलीसांना पाहिजे असल्याने, आरोपीचे अटक वॉरंट घेवून बेलापूर कोर्टाकडून आरोपीचा ताबा घेतला. तळोजा जेल येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आलेली आहे.

हेही वाचा -

  1. Online Financial Fraud Mumbai विद्युत बिल थकित असल्याचा मॅसेज आलाAppवर माहिती भरताच बॅंकेतून लाखो रुपयांची चोरी
  2. New Delhi Crime News मॅट्रीमोनियल साईटवरून तब्बल 700 तरुणींची फसवणूक दोन नायजेरियन भामट्यांना अटक
  3. Bank Detail Leaked तब्बल एक लाख लोकांचे बँक डिटेल्स लीक सायबर चोराला अटक तुमचे अकाउंट तर नाही ना

Last Updated : May 17, 2023, 9:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.