ETV Bharat / state

पुण्यात पोलिसांनी जप्त केले 371 बेकायदेशीर कोयते - पुणे बेकायदेशीर कोयते जप्त

पुणे पोलिसांनी शहरात कोयते विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. दोन दिवसात केलेल्या कारवाईत एकुण ३७१ कोयते जप्त केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तीन बेकायदेशीर कोयते विक्रेत्यांना अटक केली आहे.

पुण्यात ३७१ बेकायदेशीर कोयते जप्त
author img

By

Published : Sep 19, 2019, 8:59 PM IST

पुणे - शहरात मागील काही दिवसात होत असलेल्या हाणमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात कोयत्याचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून आले आहे. त्यामुळे खुनांचे प्रमाणही वाढले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात कोयते विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. दोन दिवसात केलेल्या कारवाईत ३७१ कोयते जप्त केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी बेकायदेशीर कोयते विक्रेत्यांना अटकही केली आहे.

पुण्यात ३७१ बेकायदेशीर कोयते जप्त

हेही वाचा - टिकटॉकवरून आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; आदिवासी संघटनेचे निषेध आंदोलन

कोयते विक्री करणाऱ्या जयसिंग शामराव पवार (वय ३४), महावीर ब्रिजलाल गुप्ता (वय ४५), नितीन ज्ञानेश्वर नाईक आणि आशिष शांतिभूषण नाईक या चौघांना अटक केली आहे. या आरोपींनी बेकायदेशीर कोयते ठेवल्यामुळे त्यांना अटक केली आहे.

मागील 3 वर्षात पुणे शहरात झालेल्या ५०० हुन अधिक गंभीर गुन्ह्यात कोयत्याचा वापर झाला आहे. शहरातील जुना बाजार, खडक परिसरातील काही दुकानात अगदी सहज हे कोयते विक्रीसाठी उपलब्ध होतात. २०० रुपयांना हा कोयत्याची विक्री व्हायची. पोलिसांनी कोयते विक्री करणाऱ्यांना लक्ष केले असून आतापर्यंत ३७१ कोयते जप्त केले आहेत.

जयसिंग पवार यांच्या मंगळवार पेठेतील एका दुकानातून ११ कोयते, तर मंगळवार पेठेतीलच महावीर गुप्ता याच्या हार्डवेअरच्या दुकानातून तब्बल १३१ लोखंडी कोयते जप्त केले आहेत. तर गुरुवारी केलेल्या कारवाईत पोलिसांना स्वारगेट येथील नाईक बी-बियाणांच्या दुकानात छापा टाकून २२९ कोयते जप्त केले आहेत. फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - अमरावतीत जुन्या वादातून युवकाची हत्या; आरोपी फरार

पुण्यात पोलिसांनी जप्त केले 371 बेकायदेशीर कोयते

Intro:(बाईट व्हिज्युअल व्हाट्सएपवर)
शहरात मागील काही दिवसात होत असलेल्या हाणामारीच्या घटनांत वाढ झाली आहे..हाणामारीच्या या घटनांमध्ये लांबलचक कोयत्याचा वापर होताना दिसून आले..या घटनांमध्ये काहींचा खून झाला तर अनेक जखमी झाले आहेत..या सर्व पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांना शहरात कोयते विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली.दोन दिवसात केलेल्या कारवाईत 371 कोयते जप्त केले आहेत..पोलिसांनी याप्रकरणी अवैधरित्या कोयते विक्री करणाऱ्या जयसिंग शामराव पवार (वय 34), महावीर ब्रिजलाल गुप्ता (वय 45), नितीन ज्ञानेश्वर नाईक आणि आशिष शांतिभूषण नाईक या चौघांना अटक केलीय.
Body:मागील तीन वर्षात पुणे शहरात झालेल्या 500 हुन अधिक गंभीर गुन्ह्यात कोयत्याचा वापर झाला आहे..शहरातील जुना बाजार, खडक परिसरातील काही दुकानात अगदी सहज हे कोयते विक्रीसाठी उपलब्ध होतात..दोनशे रुपये इतक्या किरकोळ किमतीत याची विक्री होत होती..पोलिसांनी या कोयते विक्री करणाऱ्यांना लक्ष केले असून आतापर्यंत 371 कोयते जप्त केले आहेत..
Conclusion:जयसिंग पवार यांच्या मंगळवार पेठेतील एका दुकानातून 11 कोयते, तर मंगळवार पेठेतीलच महावीर गुप्ता याच्या हार्डवेअरच्या दुकानातून तब्बल 131 लोखंडी कोयते जप्त केले आहेत..तर गुरुवारी केलेल्या कारवाईत पोलिसांना स्वारगेट येथील नाईक बी-बियाणांच्या दुकानात छापा टाकून 229 कोयते जप्त केले आहेत..फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.