पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणे अयोग्य आहे. मोदींची हुजरेगिरी करणारे लोक वारंवार असे प्रकार करताना दिसत आहेत, अशी टीका मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे. नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकाचे नाव 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे आहे. यानंतर मराठी क्रांतीचे राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे.
कोंढरे पुढे म्हणाले, यापूर्वीही नरेंद्र मोदी यांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर चिकटवला होता. नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची हुजरेगिरी करणारे लोक वारंवार असे प्रकार करताना दिसत आहेत. मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करताना दिसत आहेत. हे अतिशय अयोग्य आहे. शिवाजी महाराज महाराष्ट्र आणि भारताची अस्मिता आहे. त्यामुळे संपूर्ण जनता शिवाजी महाराजांकडे आदराने पाहते. त्यामुळे त्यांच्यासोबत मोदी यांची तुलना करणे अतिशय अयोग्य आहे. त्या पुस्तकाचे शिर्षक त्वरित बदलण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा - नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'