ETV Bharat / state

पुणा नाईट हायस्कूलचा अभिनव उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांसाठी 'सायकल बँक'

शाळेत येणारे बहुतांश मुले पायीच ये-जा करतात. त्यातूनच मग पुढे ही 'सायकल बँक' कल्पना अस्तित्वात आली. या योजनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सायकली मिळत आहे.

Cycle Bank Pune
सायकल बँक
author img

By

Published : Jan 29, 2020, 5:32 PM IST

पुणे- घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे गरीब विद्यार्थी आई-वडिलांना हातभार लावण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करतात. पण, अशाही परिस्थितीत या विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ काही शांत बसू देत नाही. त्यामुळे, काम झाल्यानंतर ते रात्रशाळेत धाव घेतात. शिक्षणाच्या ओढीने दिवसा काम आणि रात्री शाळा अशी तारेवरची कसरत करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरस्वती मंदिर संस्थेच्या पुणा नाईट हायस्कुलने 'सायकल बँक' हा उपक्रम सुरू केला आहे.

सायकल बँकबाबत पहा 'ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट

पुण्यातील या रात्रशाळेला शंभर वर्षे झाली आहेत. सध्या या शाळेत आठवी ते बारावी अशी पाचशेहून अधिक मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेत बहुतांश मुले ही ग्रामीण भागातील आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे दिवसभर लहान-सहान कंपन्या आणि दुकानात ही मुले काम करतात. मुलांना कामाचा मोबदलाही तुटपुंजा मिळतो. तरी देखील दिवसभार काम करून ही मुले रात्री शाळेत येतात. यातील बहुतांश मुले पायीच ये-जा करतात. त्यातूनच मग पुढे ही 'सायकल बँक' कल्पना अस्तित्वात आली. या योजनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सायकली मिळत आहे. गरज पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना या सायकली वापस कराव्या लागतात जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्याचा लाभा घेता येतो. या योजनेमुळे गरजू विद्यार्थ्यांना खूप फायदा होत आहे.

हही वाचा- वर्गमित्रांनीच विद्यार्थ्याला बदडले, वर्गात प्रश्नांची उत्तरे देतो म्हणून मारहाण केल्याचा आरोप

Intro:
रात्रशाळेत शिक्षण घेणाऱ्या गरजु विद्यार्थ्यांसाठी 'सायकल बँक'; पूना नाईट हायस्कुलचा अभिनव उपक्रम

घरची परिस्थिती बेताची...त्यामुळे आई-वडिलांना हातभार लावण्यासाठी ते दिवसभर काबाडकष्ट करतात..पण अशाही परिस्थितीत शिक्षणाची ओढ काही शांत बसू देत नाही..त्यामुळे काम झाल्यानंतर ते रात्रशाळेत धाव घेतात..शिक्षणाच्या ओढीने दिवसा काम आणि रात्री शाळा अशी तारेवरची कसरत करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरस्वती मंदिर संस्थेच्या पूना नाईट हायस्कुलने सायकल बँक हा उपक्रम सुरू केलाय..या उपक्रमाविषयी सांगताना शाळेचे प्राचार्य अविनाश ताकवले म्हणतात....

बाईट.....(अविनाश ताकवले)

पुण्यातील या रात्रशाळेला शंभर वर्षे झाली. सध्या या शाळेत आठवी ते बारावी अशी पाचशेहुन अधिक मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेत बहुतांश मुले ही ग्रामीण भागातील असतात..आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे दिवसभर लहान-सहान कंपन्या, दुकानात काम करतात..आणि रात्री शिक्षण घेतात..यातील बहुतांश मुले पायीच ये-जा करायचे..त्यातूनच मग पुढे ही सायकल बँक कल्पना अस्तित्वात आली..अनेक विद्यार्थ्यांना या सायकल बँक योजनेचा फायदाही झालाय..

बाईट...(विद्यार्थी)

या योजनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गरज पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या सायकली परत करायच्या आहेत..जेणेकरून इतर गरजू विद्यार्थ्यांना या सायकली देता येतील..

रात्रशाळेत शिकणारे विद्यार्थी दिवसभर काम करत असतात..त्यांना मिळणारे वेतनही तुटपुंजे असते..अशा परिस्थितीत ते शिक्षणापासून दूर जाण्याची शक्यता असते..अशा परिस्थितीत ही सायकल बँक योजना या विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी मोलाची भूमिका बजावणार आहे....
किरण शिंदे ईटीव्ही भारत पुणे

Body:।।।Conclusion:।।।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.