पिंपरी-चिंचवड (पुणे) - पुण्यातील एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. या आमदारांच्या जवळच्या व्यक्तीने या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
हे आमदार गेल्या काही दिवसांपासून अंगदुखीने त्रस्त होते. त्यामुळे त्यांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात ते पॉझिटीव्ह निघाले आहेत. या आमदारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात जाऊन नागरिकांशी संवाद साधला होता.
गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाचा आढावा घेतला होता. तेव्हा, कार्यकर्त्यांनी गर्दी करत सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडवला. त्यानंतर तेथील डॉक्टरांची बैठक घेतली गेली, त्या बैठकीला हे आमदार उपस्थित होते. यावेळी स्थानिक आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींची कोरोना टेस्ट होणार आहे.
पुण्यातील एका आमदाराला कोरोनाची लागण - mla corona positive pune
पुण्यातील एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते अंगदुखीने त्रस्त होते. त्यामुळे त्यांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात ते पॉझिटीव्ह निघाले आहेत. या आमदारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात जाऊन नागरिकांशी संवादही साधला होता.