ETV Bharat / state

झटपट श्रीमंत होण्यासाठी व्यापाऱ्याचे केले होते अपहरण; अवघ्या सहा तासांत आरोपी ताब्यात!

सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जणांच्या टोळीने कांतीलाल गणात्रा (वय-65 रा. सिटी पार्क सोसायटी, मार्केट यार्ड) या व्यापाऱ्याचे अपहरण केले होते. अपहरण झाल्यानंतर आरोपींनी दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत, अवघ्या सहा तासांमध्ये या टोळीतील तिघांना अटक केली आहे.

Pune Gang of three arrested for kidnapping a businessman within six hours of incident
author img

By

Published : Nov 15, 2019, 9:37 PM IST

Updated : Nov 15, 2019, 11:30 PM IST

पुणे - झटपट श्रीमंत होण्यासाठी, मार्केटयार्ड येथील व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दीड कोटींची रोख रक्कम, तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली फॉर्च्युनर गाडी आणि दुचाकी असा 1 कोटी 75 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

झटपट श्रीमंत होण्यासाठी व्यापाऱ्याचे केले होते अपहरण; अवघ्या सहा तासांत आरोपी ताब्यात!

अजय बाळासाहेब साबळे (24), सुजित किरण गुजर (24), ओंकार श्रीनाथ वाल्हेकर (20) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अजय साबळे हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. तर, या तिघांचा साथीदार अमित पोपट जगताप (20) हा फरार आहे.

सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौघांनी कांतीलाल गणात्रा (वय-65 रा. सिटी पार्क सोसायटी, मार्केट यार्ड) या व्यापाऱ्याचे अपहरण केले होते. कांतीलाल हे गुरुवारी रात्री घरी जात असताना, या चौघांपैकी तीन जण दुचाकीवरून आले, आणि कांतीलाल यांना जबरदस्तीने फॉर्च्युनर गाडीमध्ये बसवले. या टोळीमधील चौथा साथीदार ती चारचाकी चालवत होता.

हा सर्व प्रकार पाहणाऱ्या एका नागरिकाने घटनेची माहिती तत्काळ नियंत्रण कक्षाला दिली. या माहितीच्या आधारे मार्केटयार्ड पोलिसांनी गणात्रा यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्याच दरम्यान आरोपींनी कांतीलाल गणात्रा यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन करत दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली. तसेच पोलिसांना माहिती सांगितल्यास गणात्रा यांना ठार मारण्याची धमकी दिली. आरोपींनी गणात्रा यांच्या मुलाला खंडणीची रक्कम घेऊन चांदणी चौकात येण्यास सांगितले.

त्यानुसार, पोलिसांनी चांदणी चौकात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. यावेळी पैसे स्वीकारताना सुजित गुजर आणि ओंकार वाल्हेकर या दोघांना पोलिसांनी अटक केली. मात्र, मुख्य सूत्रधार अजय साबळे आणि अमित जगताप हे खंडणीसाठी आणलेली दीड कोटीची रक्कम घेऊन फॉर्च्युनर गाडीतून पसार झाले. त्यानंतर, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडे अधिक चौकशी केली आणि त्यानुसार शोध घेत अजय साबळे याला अटक केली.

पैसे मिळाल्याची खात्री झाल्यानंतर आरोपींनी कांतीलाल गणात्रा यांना खेड-शिवापूरजवळील शिंदेवाडी येथे सोडून दिले होते. ते आता सुखरूप आहेत. आरोपींची चौकशी सुरू असून त्यांनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा : सेल्समन बनून घरफोडी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला बेड्या

Intro:दोन कोटीच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण;
पोलिसांनी सहा तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या

झटपट श्रीमंत होण्यासाठी मार्केटयार्ड येथील व्यापाऱ्याचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण
करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांनी सहा तासात अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली..पोलिसांनी आरोपीकडून दीड कोटीची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्युनर गाडी आणि दुचाकी असा 1 कोटी 75 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय.

अजय बाळासाहेब साबळे (वय-24), सुजित किरण गुजर (वय-24), ओंकार श्रीनाथ वाल्हेकर (वय-20) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील अजय साबळे हा मुख्य सूत्रधार आहे. तर याच गुन्ह्यातील अमीत पोपट जगताप (वय-20) हा फरार आहे. त्यांनी कांतीलाल गणात्रा (वय-65 रा. सिटी पार्क सोसायटी, मार्केट यार्ड) या व्यापाऱ्याचे अपहरण केेले होते. Body:सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांतीलाल गणात्रा हे गुरुवारी रात्री घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचे फॉच्युनर कारमधून अपहरण केले. प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका नागरिकाने घटनेची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला दिली. या माहितीच्या आधारे मार्केटयार्ड पोलिसांनी गणात्रा यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्याच दरम्यान आरोपींनी कांतीलाल गणात्रा यांच्या मोबाईलवरून मुलाला फोन करुन दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली. तसेच पोलिसांना माहिती सांगितल्यास गणात्रा यांना ठार मारण्याची धमकी दिली. आणि खंडणीची रक्कम घेऊन चांदणी चौकात घेऊन येण्यास सांगितले. Conclusion:त्यानंतर पोलिसांनी चांदणी चौकात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. यावेळी पैसे स्वीकारताना सुजीत गुजर आणि ओंकार वाल्हेकर या दोघांना अटक केली मात्र मुख्यसुत्रधार अजय साबळे आणि अमित जगताप हे खंडणी देण्यासाठी आणलेली दीड कोटीची रक्कम घेऊन फॉच्युनर गाडीतून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडे अधिक चौकशी केली आणि शोध घेऊन अजय साबळे याला अटक केली. आरोपींनी पैसे मिळाल्याची खात्री झाल्यानंतर कांतीलाल गणात्रा यांना खेड शिवापूर येथील शिंदेवाडी येथे सोडून दिले. आरोपींकडे चौकशी सुरु असून त्यांनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का ? याचा तपास पोलीस करीत आहेत.
Last Updated : Nov 15, 2019, 11:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.