पुणे : Pune Ganesha Immersion : पुणे महानगरपालिकेमार्फत गणरायाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आलीय. विसर्जनाच्या दृष्टीनं १५ क्षेत्रिय कार्यालयांनी त्यांच्या परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था केलीय. यासोबतच निर्माल्य कलश, किटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशमन दल, घाटांवर औषध फवारणीही करण्यात आलीय. तसंच ज्या भागात नदी, तलाव, विहीरी नाहीत अशा परिसरात विसर्जन हौद म्हणून लोखंडी टाक्यांची सोय करण्यात आलीय.
कोणत्या घाटांवर तयारी पूर्ण : पुणे महापालिका हद्दीतील संगम घाट, वृद्धेश्वर घाट/ सिद्धेश्वर घाट, अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ), पुलाची वाडी, नटराज सिनेमा, बापूघाट (नारायण पेठ), विठ्ठल मंदिर (अलका चौक), ठोसरपागा घाट, राजाराम पूल घाट, सिध्देश्वर मंदिर, चिमा उद्यान येरवडा, नेने/आपटे घाट, ओंकारेश्वर, खंडोजी बाब चौक, गरवारे कॉलेजची मागील बाजू, दत्तवाडी घाट, अधगाव घाट, बंडगार्डन घाटवारजे कर्वेनगर गल्ली क्र. १ नदीकिनार आणि पांचाळेश्वर घाट अश्या 18 प्रमुख घाटांवर गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण झालीय.
आरोग्याविषयी जनजागृती : मनपा आरोग्य विभागाकडूनही उपाययोजना : गणपती विसर्जनानिमित्त पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडूनही विशेष काळजी घेतली जात आहे. आरोग्य खात्याकडं ४ मोबाईल क्लिनिक असून, त्या गणेश विसर्जन मार्गावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या मोबाईल क्लिनिकमार्फत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार केले जातील. आपत्कालीन परिस्थितीमध्ये या सर्व मोबाईल क्लिनिक सोबत १०८ ची रुग्णवाहिका सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संपूर्ण गणेशोत्सव दरम्यान पुणे मनपाअंतर्गत असणारे सर्व दवाखाने व रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार देण्यात येणार आहेत. सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्षांना भेटून याविषयी हस्त पत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणच्या गणेशोत्सव मंडप व विसर्जन हौद येथे आरोग्याविषयी बॅनर्स लावण्यात येणार आहेत. टेम्पोद्वारेही आरोग्याविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याचं पुणे मनपाच्या आरोग्य विभागानं सांगितलंय. सर्दी, खोकला, ताप असणाच्या व्यक्तींनी गर्दीत जाण्याचं टाळण्याचं आवाहनही पुणे मनपानं केलंय.
हेही वाचा :
- Lalbaugcha Raja : नशाबंदी मंडळानं लालबागच्या राजाला घातलं 'हे' साकडं; पाहा व्हिडिओ
- Muslim Devotees Garlands for Mahaganapati : कोल्हापुरात अनोखं हिंदू मुस्लिम ऐक्य; महागणपतीसाठी 42 वर्ष मुस्लिम भक्त करतो पुष्पहार
- Goldan Modak In Nashik : नाशकात बाप्पांच्या नैवेद्यासाठी 16 हजार रुपये किलोचे गोल्डन मोदक