पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ( Maratha Reservation Issue ) छत्रपती संभाजीराजे पुन्हा एकदा आक्रमक होत आहेत. छत्रपती संभाजीराजे येत्या 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार ( Hunger Strike for Maratha Reservation ) आहे. त्यांच्या या उपोषणाला पुणे जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच या उपोषणाला जिल्ह्यातील हजारो नागरिक जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिली.
उपोषणाला हजारो नागरिक जाणार -
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख मंत्र्यांबरोबर बैठका घेतल्या. बैठकीतील मागण्या मान्य करून त्या पूर्ण करण्यासाठी शासनाने पंधरा दिवसांचा वेळ मागितला होता. त्यासाठी दीड महिन्याचा वेळ दिला. परंतु आज आठ महिने उलटले तरी अद्याप समाजाच्या मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. यामुळे समाजाला न्याय मिळावा यासाठी 26 फेब्रुवारी पासून मुंबई येथील आजाद मैदानावर खासदार संभाजीराजे आमरण ( Chhatrapati Sambhaji Raje Hunger Strike ) उपोषणाला बसणार ( Hunger Strike On 26 February )आहेत. यासाठी पुणे शहर जिल्ह्यातून पाठिंब्यासाठी हजारो नागरिक या उपोषणाला जाणार असल्याचे यावेळी कोंढरे यांनी सांगितले.
मंत्री विजय वडेट्टीवार ( Minister Vijay Vadettiwar ) दोन समाजात तेढ निर्माण करत आहे -
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही हातात तलवारी घेऊन वार कोणावर करणार, असे वादग्रस्त विधान करून स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी दोन समाजात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. वडेट्टीवार यांच्या या विधानाचा मराठा क्रांती मोर्चाच्या ( Maratha Kranti Morcha ) वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. राज्य शासनाने मराठा आरक्षण आणि ओबीसी राजकीय आरक्षणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून 26 फेब्रुवारी पर्यंत मार्ग काढावा. सरकारने तसं केले नाही. तर त्याचा परिणाम महाराष्टरभर दिसेल. कारण लोकं खुप वैतागली आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या हाताला धरुन थांबवू शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न आम्ही लोकांवर सोडला आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणा बाबत टाळाटाळ करत आहे, असे कोंढरे यांनी सांगितले.