ETV Bharat / state

पुण्याच्या उपमहापौरांचा राजीनामा; पुढचा उपमहापौर आरपीआयचा

author img

By

Published : Mar 16, 2021, 5:15 PM IST

भारतीय जनता पक्षाला २०१७ मध्ये पुणे महापालिकेत मोठे यश मिळाले होते. या निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या आरपीआयचे पाच नगरसेवक निवडून आले होते. मात्र शहरातील आरपीआयला मानणारा मोठा वर्ग असल्याने त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला होता. त्यामुळे उपमहापौरपद सुरुवातीला आरपीआयला देण्यात आले होते. त्यानंतर भाजपच्या सरस्वती शेंडगे यांची या पदावर वर्णी लागली होती. आता हे पद पुन्हा आरपीआयकडे जाणार आहे.

पुणे महानगरपालिका
पुणे महानगरपालिका

पुणे- महानगरपालिकेच्या उपमहापौर पदावर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नगरसेवकाची वर्णी लागणार आहे. विद्यमान उपमहापौर असलेल्या भाजपच्या सरस्वती शेंडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नुकताच दिला आहे. आता उपमहापौरपद पुन्हा आरपीआयकडे जाणार आहे. यापूर्वी आरपीआयचे सिद्धार्थ धेंडे हे उपमहापौर राहिले आहेत. पुणे महानगरपालिकेत सध्या सत्ताधारी भाजपकडे असलेल्या विविध पदांची खांदेपालट सुरू आहे.

भारतीय जनता पक्षाला २०१७ मध्ये पुणे महापालिकेत मोठे यश मिळाले होते. या निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या आरपीआयचे पाच नगरसेवक निवडून आले होते. मात्र शहरातील आरपीआय ला मानणारा मोठा वर्ग असल्याने त्याचा फायदा भाजपला निवडणूकीत झाला होता. त्यामुळे उपमहापौरपद सुरुवातीला आरपीआय ला देण्यात आले होते. त्यानंतर भाजपच्या सरस्वती शेंडगे यांची या पदावर वर्णी लागली होती. आता हे पद पुन्हा आरपीआयकडे जाणार आहे. मात्र आरपीआय मध्ये देखील या पदासाठी अंतर्गत मोठी रस्सी खेच सुरु आहे. त्यामुळे आता पुण्याचे उपमहापौर पद आरपीआय कोणाला देणार हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान महापालिकेतील विविध पदांची खांदेपालट होत असताना पीएमपीएमएल चे संचालक पद देखील बद्लवण्याचे भाजपचे प्रयत्न आहे. मात्र विद्यमान संचालक शंकर पवार हे राजीनामा देणार नाही अशा भूमिकेत असल्याने भाजप समोर पक्षातर्गत अडचणी दिसतं आहे. एकंदरीतच पुणे महानगरपालिकेच्या निवडणूका आता काही महिन्यावर आहे. त्यामुळे भाजपकडून पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी विविध पदांचा वापर होत आहे.

हेही वाचा-राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर; केंद्र सरकारचे राज्याला पत्र

हेही वाचा-'हिरेन मृत्यूप्रकरणी सरकारला कोणताही धोका नाही; आमचे सरकार मजबूत'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.