पुणे Pune Crime News : पुणे शहराला विद्येच माहेरघर तसेच सांस्कृतिक राजधानी देखील म्हटल जातं. या सांस्कृतिक राजधानीत गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थाच्या तस्करी मध्ये वाढ झालीय. अशातच पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच २ कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यामुळं परिसरात एकच खळबळ उडालीय. मात्र, ससून रुग्णालय परिसरातच हे ड्रग्ज आढळून आल्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
2 कोटींचे ड्रग्स जप्त : पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून तब्बल १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले आहेत. या मेफिड्रोनची किंमत तब्बल २ कोटी रुपये आहे. यात हाय प्रोफाईल रॅकेट असून कुख्यात आरोपी ललित पटेल आणि आणखी २ तरुण यात सहभागी असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
पोलीसांचा तपास सुरू : ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्स ची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलीसांनी अटक करुन त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. अशातच वैद्यकीय उपचारासाठी त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. ससून रुग्णालयातील कोणी कर्मचारी या प्रकरणात आहे का? या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे.
हेही वाचा :