ETV Bharat / state

Pune Crime: भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने 'पत्नी'लाच उतरवले वेश्याव्यवसायात...पतीसह तिघांना अटक - वेश्याव्यवसाय

पुणे शहरात नात्यांना काळिमा फासणाऱ्या घटना सातत्यानं घडत आहे. काही दिवसांपूर्वी वडिलांनीच मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. आता फक्त तीन हजार रुपयांसाठी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यानेच पत्नीला वेश्याव्यवसायात उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीसह त्याच्या दोन मित्रांना बुधवारी अटक करण्यात आलीय.

Pune Crime News
तिघांना अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 11:23 AM IST

Updated : Aug 24, 2023, 11:28 AM IST

पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ झालीय. शहरात गुन्हेगारीच्या संदर्भात वेगवेगळे प्रकार घडत आहे. अशातच पतीनं केवळ तीन हजार रुपयांसाठी पत्नीला वेश्याव्यवसायात उतरवल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडलीय. पीडित महिलेचा पती भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यासह दोनजणांना अटक केलीय. या प्रकरणी 25 वर्षांच्या पीडितेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पैशाच्या लालसेपोटी पत्नीला वेश्याव्यवसायात उतरवले : याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिलेला तिचा पती लग्न झाल्यापासून सातत्यानं त्रास देत आहे. आता तर त्याने मर्यादा ओलांडत पैशाच्या लालसेपोटी पत्नीला मारहाण केली. तिला जबरदस्तीनं वेश्याव्यवसायासाठी उंड्री हांडेवाडी या रस्त्यावर उभं केलं होतं. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. संबंधित पीडित महिलेला वारंवार पतीकडून मारहाण होत होती. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, तर नराधम पतीनं त्याच्या दोन मित्रांनाच ग्राहक बनवले. मित्रांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेतले. त्याच्या पत्नीला त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास बळजबरी केली होती. त्याच्या दोन्ही मित्रांनी तिच्यासोबत इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर ते दोघेही पीडितेला त्रास देत होते.

पती आणि त्याच्या दोन्ही मित्रांविरोधात तक्रार : पीडित महिला रस्त्यानं जात असताना तिच्या पतीच्या या दोन मित्रांनी तिला अडवले होते. तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळं पीडिता घाबरली. तिनं थेट पोलीस ठाणे गाठले. पती आणि त्याच्या दोन्ही मित्रांविरोधात पीडितेनं तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी लगेच कारवाई केली. याप्रकरणी पीडितेच्या पतीसह त्याच्या दोन मित्रांना अटक करण्यात आलीय. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे. सध्या पीडित महिलेचा पती जामीनावर बाहेर आला. परंतु त्याचे दोन्ही मित्र अटकेत आहेत. पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे. पैशाच्या हव्यासापोटी पतीने आपल्या पत्नीला वेश्याव्यवसायात उतरवलं, या घटनेमुळं संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

  1. Murder Case : नागपूर महिला हत्या प्रकरण; मध्यप्रदेशातील आमदाराची होणार चौकशी
  2. Sexual abuse students: महापालिकेच्या शाळेत ३ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण, पालकांनी चोप दिल्यानंतर पीटीच्या शिक्षकाला अटक
  3. Sana Khan Murder : भाजप नेत्या सना खान यांची हत्या; एकाला अटक, जबलपूरमध्ये मृतदेहाचा शोध सुरू

Last Updated : Aug 24, 2023, 11:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.