ETV Bharat / state

Tomato Theft : पुणे जिल्ह्यात टोमॅटोची चोरी, शेतकऱ्याचे तब्बल 400 किलो टोमॅटो चोरीला!

author img

By

Published : Jul 21, 2023, 4:02 PM IST

पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे 400 किलो टोमॅटो चोरीला गेले आहेत. यामुळे या शेतकऱ्याचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tomato
टोमॅटो

पुणे : देशभरात टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये टोमॅटो तब्बल 100 ते 200 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटनाही उघडकीस येत आहेत. आता पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने 400 किलो टोमॅटोच्या चोरीचा आरोप करत पोलिसांकडे धाव घेतली आहे. टोमॅटोच्या चोरीमुळे आपले सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्याने पोलिसांना सांगितले आहे.

20 टोमॅटो क्रेटची चोरी : ही घटना पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील आहे. फिर्यादी शेतकरी अरुण ढोमे यांनी पोलिसांना सांगितले की, रविवारी त्यांनी त्यांच्या शेतातून टोमॅटोची काढणी केली आणि मजुरांच्या मदतीने टोमॅटो घरी आणले. मात्र, सोमवारी सकाळी ढोमे यांना जाग आली तेव्हा त्यांना 400 किलो वजनाचे 20 टोमॅटो क्रेट गायब झाल्याचे आढळले. आपले टोमॅटो चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर ढोमे यांनी शिरूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

देशभरात टोमॅटो चोरीच्या घटना घडत आहेत : टोमॅटोचे दर नवे उच्चांक गाठू लागल्यापासून देशाच्या विविध भागांत टोमॅटो चोरीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील बेंगळुरू येथे तीन जणांनी टोमॅटोने भरलेला पिकअप ट्रक जबरदस्तीने ताब्यात घेण्याची घटना घडली होती. तर कर्नाटकच्याच हसन जिल्ह्यातील एका शेतातून 2.5 लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले होते. यासोबतच बेलूर तालुक्यातील गोणी सोमनहळ्ळी येथेही टोमॅटोची चोरी झाली आहे. येथील एका शेतकऱ्याने सांगितले की, त्याच्या 2 एकर शेतात पिकवलेला भाजीपाला चोरट्यांनी एका रात्रीत चोरून नेला. या प्रकरणी पोलिसांचा तपास चालू आहे.

हे ही वाचा :

  1. Tomato Truck Stolen : आता होतेय टोमॅटोची चोरी! बेंगळुरूमध्ये टोमॅटोने भरलेला पिकअप ट्रक चोरट्यांनी पळवला
  2. Tomato Tula : अजब टोमॅटोची गजब कहानी!...आता मंदिरात एका भाविकाने केली चक्क 'टोमॅटोतुला'
  3. Tomato Farmer Crorepati : लाल टोमॅटोमुळे शेतकरी झाला मालामाल! टोमॅटो विकून कमावले करोडो रुपये!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.