ETV Bharat / state

Pune Crime : दुकान बंद करून घरी जाणाऱ्या सराफावर गोळीबार, कोट्यवधीचं सोनं लुटलं! - वरिष्ठ पोलीस अधिकारी

Pune Crime : पुण्यात बुधवारी (8 नोव्हेंबर) रात्री दुकान बंद करुन घरी जाणाऱ्या सराफावर भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या या घटनेत सराफ व्यावसायिक प्रतिक मदनलाल ओसवाल( वय 35) गंभीर जखमी झाले आहेत.

firing on saraf businessman in pune
पुण्यातील सराफावर गोळीबार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 8:22 AM IST

पुणे Pune Crime : सध्या सर्वच दिवाळी सणाची लगबग सुरू असून पुण्यात विविध बाजारपेठ सजल्या आहेत. असं असताना बुधवारी (8 नोव्हेंबर) रात्री पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुण्यातील एका प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रतिक मदनलाल ओसवाल असं गंभीर जखमी झालेल्या सराफाचं नाव असून गोळीबार करून हल्लेखोरांनी ओसवाल यांच्याकडील कोट्यावधींचं सोनं लुटलंय.

भररस्त्यात सराफावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या : वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बी.टी. कवडे रोडवर ही घटना घडली आहे. तसंच प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी प्रतिक ओसवाल यांच्यावर सहा गोळ्या झाडत त्यांच्याकडून सोनं चांदीची बॅग पळवून नेली. या घटनेमुळं पुणे शहर हादरलंय.

कशी घडली घटना : याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी रात्री वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बी.टी. कवडे रोड येथे रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास दुचाकीवर ओसवाल आणि त्यांचा मुलगा जात होते. तेव्हा अचानक एका दूसऱ्या दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये ओसवाल गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुणालयात दाखल करण्यात आलंय. हा गोळीबार नेमका कोणी आणि कोणत्या कारणावरून करण्यात आला, हे मात्र समजू शकलेलं नाही. या घटनेत ओसवाल यांना तोंडात आणि मांडीत गोळी लागली आहे. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. दरम्यान,या घटनेमुळं पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा -

  1. Pune Crime : पिझ्झा द्यायला उशीर झाल्यानं ग्राहकाची डिलिव्हरी बॉयला मारहाण, हवेत गोळीबार करून केली दहशत
  2. IT Raids Pune: पुण्यातील निळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड; 40 वाहनांमधून अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल
  3. Baramati Crime News : महिलेवर बलात्कार करत उकळले पैसे; पीडितेच्या पतीलाही ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.