ETV Bharat / state

गँगस्टर शरद मोहोळचा दिवसाढवळ्या गेम; लग्नाच्या वाढदिवसालाच भयावह शेवट - sharad mohol news

Gangster Sharad Mohol Death : पुण्यात गँगस्टर शरद मोहोळवर अज्ञातानं गोळीबार केला. या घटनेनंतर जखमी झालेल्या मोहोळवर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. हल्ला करणाऱ्या 3 आरोपींपैकी एक आरोपी निष्पन्न झालाय. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असं या आरोपीचं नाव आहे. पोळेकर यानं त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरुड भागात गोळीबार केलाय.

firing on gangster Sharad Mohol
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 2:43 PM IST

Updated : Jan 5, 2024, 9:10 PM IST

शरद मोहोळवर गोळीबार झाल्यानं पुण्यात खळबळ

पुणे Gangster Sharad Mohol Death - पुण्यातील कोथरूडमधील सुतारदरा परिसरात दिवसाढवळ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर गोळीबार (Gangster Sharad Mohol Shot) झाला. गोळीबारात मोहोळला तीन गोळ्या लागल्यानंतर पोलिसांनी मोहोळला पुण्यातील वनाज येथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच गँगस्टरचा मृत्यू झाला.

शरद मोहोळ याच्या लग्नाचा शुक्रवारी वाढदिवस असतानाच त्याच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गँगस्टरवर गोळीबार कोणी केला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. ससून रुग्णालयात शरद मोहोळचा मृतदेह शविच्छेदनसाठी नेण्यात आला. मागील महिन्यात पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन येथे जमिनीच्या व्यवहारातून गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणावरूनच मोहोळवर गोळीबार झालं असल्याची चर्चा आहे.

  • पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अशातच कोथरुड येथे दिवसाढवळ्या गँगवॉर झाल्यानं गुंडगिरीचं प्रमाण वाढल्याचं अधोरेखित झालं आहे. गोळीबाराच्या घटनेनं राज्याची 'सांस्कृतिक राजधानी' अशी ओळख असलेल्या पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
  • शरद मोहोळ याच्याविरुद्ध पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. काही गुन्ह्यांमध्ये न्यायालयानं मोहोळची निर्दोष मुक्तता केली आहे. मोहोळ यानं त्याच्या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रमदेखील घेतले होते. गुन्हेगारीतून थेट सामाजिक कार्याकडं मोहोळ वळल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

शरद मोहोळच्या पत्नीचा भाजपा प्रवेश : पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहळचा एप्रिल 2023 मध्ये भाजपात प्रवेश झाला होता. त्यावेळी स्वाती मोहोळ यांनी पक्षातील जबाबदारी व दिलेलं काम प्रामाणिकपणे करणार असल्याचं म्हटलं होतं. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला होता. दुसरीकडं गुंड गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या पत्नीला भाजपामध्ये प्रवेश मिळाल्यानं भाजपावर टीका झाली होती.

कोण आहे शरद मोहोळ : एकेकाळी पुण्यात मोहोळ गँगची दहशत होती. मोहोळ गॅंगचे सगळे काम शरद मोहोळ काम करत असल्याची चर्चा होती. विविध गुन्ह्यांमध्ये तसंच तडीपारच्या प्रकरणात शरद मोहोळला अनेक वेळा तुरुंगात जावे लागले होते. येरवडा कारागृहामध्ये देशद्रोहाचा आरोप असलेल्या कैद्याला शरद मोहोळनं मारल्याची घटना घडली होती. तेव्हापासून त्याची कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख निर्माण झाली. याचाच फायदा भाजपाने घेण्यासाठी त्याची पत्नी स्वाती मोहोळला पक्षात एप्रिल 2023 मध्ये प्रवेश दिला. पुण्यात हिंदू आक्रोश मोर्चाचे नेतृत्वही शरद मोहोळनं केलं होतं. कसबा पोट निवडणुकीमध्ये शरद मोहोळ थेट भाजपाच्या प्रचाराकरिता मैदानात उतरला होता.

हेही वाचा-

  1. वर्चस्ववादातून चुनाभट्टीत गोळीबार करणाऱ्या चार आरोपींना आठ तासात अटक
  2. दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार; अजान पठण करताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा गोळीबारात मृत्यू

Last Updated : Jan 5, 2024, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.