ETV Bharat / state

Pune Crime : सोशल मीडियावरील ओळख पडली महागात; कॉलेज तरुणाचं अपहरण करुन केलं अनैसर्गिक कृत्य - बंडगार्डन पोलीस

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आलाय. तीन आरोपींनी महाविद्यालयीन तरुणाचं अपहरण करुन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार समोर आलाय.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime
Pune Crime
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 9:46 PM IST

माहिती देताना पोलीस अधिकारी संतोष पाटील

पुणे : Pune Crime : ऑनलाइन ॲपद्वारे ओळख करून घेणं एका महाविद्यालयीन तरुणाला महागात पडलंय. ससून रुग्णालयाच्या आवारातून तरुणाचं आमिष दाखवून अपहरण करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर त्याच्यावर भोसरी परिसरात शस्त्राचा धाक दाखवून तिघांनी अनैसर्गिक कृत्य केलंय. यानंतर आरोपींनी तरुणाला धमकावून त्याच्याकडून 28 हजार 500 रोख लुटले आहेत. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणानं बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता घडली होती.

ॲपच्या माध्यमातून तरुणाची आरोपीशी ओळख : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा तळेगाव दाभाडे, येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहे. एका ॲपच्या माध्यमातून तरुणाची आरोपीशी ओळख झाली होती. आरोपीनं त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर पुणे स्टेशन परिसरात भेटण्यासाठी त्याला बोलावलं. त्यानंतर ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ तरुणाला गाडीत बसण्यास सांगण्यात आलं. फिरायला जायचं असं सांगून आरोपींनी त्याला कारमधून भोसरी एमआयडीसी परिसरात नेलं.

अनैसर्गिक कृत्य : भोसरी एमआयडीसी परिसरातील निर्जन ठिकाणी नेल्यावर आरोपीनं त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं. तसंच तरुणाच्या खात्यातून 28 हजार 500 रुपये ऑनलाइन काढण्यात आले. यानंतर तिघेजण त्या तरुणाला कारमध्ये सोडून निघून गेले. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

सोशल मीडिया वापरताना खबरदारी घ्या : तरुणांचा ऑनलाइन ओळखीवर जास्त विश्वास आहे. यामुळं त्यांना जीवनात मोठ्या संकटाला सामोरे जावं लागत आहे. देशात गुन्हेगारीच्या विविध घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून घडल्या आहेत. तरी देखील तरुण सोशल मिडियाच्या जाळ्यात फसताना दिसून येत आहेत. त्यामुळं सोशल मिडिया वापरतांना खबरदारी घेणं म्हत्वाचं आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीनं तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ती काळजीपूर्वकच स्विकारावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा -

  1. Lonavala Gang Rape : पर्यटनाला आलेल्या मुलींचं अपहरण करून सामूहिक बलात्कार; दोन आरोपींसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
  2. Six People Murdered in Deoria : उत्तर प्रदेश हादरलं! जुन्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्यासह 6 जणांची हत्या
  3. Lovers Jumped Into Lake : प्रेमी युगुलानं बंधाऱ्यात मारली उडी, शोधकार्य सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.