ETV Bharat / state

मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण; पुण्यात काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन - modi government completing 7 years pune

देशात विविध घोषणाबाजी करत सात वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आले. जे काही सर्वसामान्य नागरिकांना आश्वासने देण्यात आली होती ती सर्व आश्वासने पाळण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे.

pune congress agitation over modi government completing 7 years
पुण्यात काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
author img

By

Published : May 30, 2021, 1:50 PM IST

पुणे - केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सात वर्षाचा कालावधी पूर्ण केला. याच्या विरोधात पुण्यात काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी 'सात वर्षात ना केला विकास, मोदींनी केला देश भकास' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सात प्रतिकात्मक पुतळे आणि काळे झेंडे आंदोलन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारविरोधात पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

सात वर्षात मोदी सरकार अपयशी -

देशात विविध घोषणाबाजी करत सात वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आले. जे काही सर्वसामान्य नागरिकांना आश्वासने देण्यात आली होती ती सर्व आश्वासने पाळण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे. देशात गेल्या दीड वर्षात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असताना मोदी सरकारला कोरोना रोखण्यात अपयश आले आहे. मोदी सरकारच्या या अपयशाच्या निषेधार्थ राज्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - मुंबईकरांना दिलासा! 1 जूनपासून सम विषम पद्धतीने दुकाने उघडणार

सर्वसामान्यांना मिळाले फक्त आणि फक्त घोषणाबाजी -

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून वारंवार फक्त घोषणाबाजी करत आहे. 'अच्छे दिन' असो त्याच पद्धतीने 15 लाख रुपये असो, कोरोनाच्या काळात वैद्यकीय सेवा असो किंवा लसीकरण या सर्व गोष्टीत फक्त आणि फक्त घोषणाबाजी करण्यात आली. कोरोनाच्या या काळातही सर्वसामान्य नागरिकांना धीर न देता नागरिकांच्या खिशाला कात्री लावत इंधन दरवाढ करण्यात आली. ना अच्छे दिन आले, ना 15 लाख आले. आम्हाला आमचे तेच पूर्वीचे दिवस हवे, असे म्हणत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. या मोदी सरकारच्या अपयशी कामगिरीविरोधात आज आंदोलन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली.

हेही वाचा - तुम्ही एकशे पाच वर्षे जगा, अण्णा हजारेंचा आमदार लंकेंना आशीर्वाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.