पुणे - भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुरांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्चाचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या मृत्यूच्या तांडवामध्ये 15 जणांचा नाहक बळी गेला आहे.
मुख्यमंत्र्यांनीसुद्धा या घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनातर्फे सर्वेतोपरी मदत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्याचबरोबर बचावकार्य अजूनही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
15 जणांचा नाहक बळी -
इमारतीची संरक्षक भिंत पत्र्याच्या खोल्यांवर कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात भिंतीच्या मलब्याखाली दबून १५ मजुरांचा नाहक बळी गेला आहे. ही घटना कोंढव्यातील सोमाजी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली. हे मजूर बिहार राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.