ETV Bharat / state

सिनेस्टाइल पाठलाग करून चाकण पोलिसांनी जप्त केला शस्त्रसाठा - pune crime news

एका गोणीमध्ये एक लोखंडी तलवार, एक लोखंडी गुप्ती, एक लोखंडी कोयता व एक लोखंडी सत्तुर अशी घातक हत्यारे मिळाली. हत्यारे, दुचाकी, मोबाइल फोन, असा एकूण 37 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

सिनेस्टाइल आरोपीला अटक
सिनेस्टाइल आरोपीला अटक
author img

By

Published : May 20, 2021, 8:40 PM IST

पुणे - खेड तालुक्यातील चाकण शहरातील एका दुचाकीचा पाठलाग करून त्याच्याकडून घातक शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपींला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

37 हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे एक वाजण्याच्या सुमारास रात्री चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत नगरपरिषद चौक चाकण येथे गस्त घालत असताना चाकण शहर बिट मार्शलचे गस्तीवरील अंमलदार यांना एका दुचाकीवरून दोघेजण संशयास्पदरित्या फिरताना आढळले. पोलिसांनी दुचाकीला थांबण्याचा इशारा केला. पोलिसांनी थांबण्यास सांगूनही दुचाकीस्वार थांबला नाही. उलट पुन्हा वेगाने जाऊ लागला. त्यामुळे बिट मार्शलने दुचाकीचा चाकण शहराच्या गल्ली बोळातून सुमारे दोन ते तीन किलोमीटर पाठलाग केला. देशमुख आळी, चाकण येथे दुचाकी गाठली आणि त्यावेळी योगेश भरत डोंगरे (वय 21, रा. शनिमंदिरा जवळ, चाकण) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे व दुचाकीवरील दोघांची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी एका गोणीमध्ये एक लोखंडी तलवार, एक लोखंडी गुप्ती, एक लोखंडी कोयता व एक लोखंडी सत्तुर अशी घातक हत्यारे मिळाली. हत्यारे, दुचाकी, मोबाइल फोन, असा एकूण 37 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पोलीस पथकाकडून कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ एक) मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, महिला पोलीस उप निरीक्षक प्रियंका साळुंखे, पोलीस कर्मचारी बजरंग साबळे, हनुमंत कांबळे, संतोष पंदरकर, मंगेश फापाळे, प्रेमकुमार पावडे, होमगार्ड भोकसे, कलेवडे, ग्रामसुरक्षा दलाचा जवान दिनेश सांगडे यांनी केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.