ETV Bharat / state

Pune ATS : टेरर फंडींग प्रकरणी पुणे दहशतवादी विरोधी पथकाकडून एकाला अटक

पुणे दहशतवादी विरोधी पथकाने ( Pune Anti Terrorism Squad ) दापोली परिसरातून एका तरुणाला मंगळवारी (दि. 24 मे) अटक केली. जुनेद मोहम्मद ( वय 28 वर्षे), असे त्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण जम्मू काश्मीरमधील गजवाते अल हिंद या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता. या अतिरेकी संघटनेकडून या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.

http://10.10.50.85//gujarat/05-May-2022/768-512-15178629-thumbnail-3x2-ahddrugs-7209724_0505newsroom_1651730126_213.jpg
छायाचित्र
author img

By

Published : May 24, 2022, 12:10 PM IST

Updated : May 24, 2022, 2:04 PM IST

पुणे - पुणे दहशतवादी विरोधी पथकाने ( Pune Anti Terrorism Squad ) दापोली परिसरातून एका तरुणाला मंगळवारी (दि. 24 मे) अटक केली. जुनेद मोहम्मद ( वय 28 वर्षे), असे त्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण जम्मू काश्मीरमधील गजवाते अल हिंद या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता. या अतिरेकी संघटनेकडून या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.

पुणे दहशतवादी विरोधी पथकाकडून एकाला अटक

मूळचा खामगाव (जि. बुलडाणा) असलेला जुनेद हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून या संघटनेच्या संपर्कात आला होता. गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने महिनाभरापूर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. तरुणाला पैसे नेमके का पाठवण्यात आले ? तो या पैशाचे काय करणार होता ? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दहशतवादी कृत्यांसाठीच हे फंडिग करण्यात आल्याचा एटीएसचा आरोप आहे. संशयीतास पुणे न्यायालयात दुपारी हजर करण्यात येणार आहे.

जुनेदची गेल्या आठ दिवसापासून दहशदतवाद विरोधी पथकाकडून चौकशी सुरू होती. दरम्यान, या प्रकरणात त्याचा सहभाग आढळून आल्याने त्याला आज पहाटे पथकाने दापोडी परिसरातून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा - Youth missing Lonavala forest : दिल्ली येथील तरुण लोणावळ्यातील घनदाट जंगलात बेपत्ता

Last Updated : May 24, 2022, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.