ETV Bharat / state

मुंबईहून गावी परतलेल्या व्यक्तीला कोरोना लागण, मूर्टी गावासह आजूबाजूचा परिसर सील - Another positive patient was found in Baramati

मुंबईहून बारामती तालुक्यातील मूर्टी गावाला परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मूर्टीसह आजूबाजूचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

pune : Another corona positive patient was found in Baramati
मुंबईहून गावी परतलेल्या व्यक्तीला कोरोना लागण, मूर्टी गावासह आजूबाजूचा परिसर सील
author img

By

Published : May 18, 2020, 12:06 PM IST

बारामती (पुणे) - मुंबईहून बारामती तालुक्यातील मूर्टी गावाला परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मूर्टीसह आजूबाजूचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. याशिवाय ग्रामस्थांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

मूर्टी गावातील एक व्यक्ती मागील काही दिवसांपासून मुंबईत वास्तवाला होती. ती काही दिवसांपूर्वीच मूर्टी गावी परतली होती. गावी परतल्यानंतर त्याला सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागला. तेव्हा त्याची गावातच तपासणी करण्यात आली. पण निदान झाले नाही. यामुळे त्याची मोरगाव येथे पुन्हा तपासणी करण्यात आली. यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील हा तिसरा कोरोना रुग्ण आहे. यासह आता कोरोना रुग्णांची संख्या ११ इतकी झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मूर्टीसह आजूबाजूचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

हेही वाचा - पुण्यात दोन दिवसात 20 कोरोनाबाधितांचा मृत्यू ; रुग्णसंख्या चारशेने वाढली

हेही वाचा - राजगुरुनगर परिसरात आढळले चार नवे कोरोना रुग्ण, सर्व बाधिताचे नातेवाईक

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.