ETV Bharat / state

नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, आठ जण जागीच ठार, एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

Ahmednagar Kalyan Highway triple accident अहमदनगर-कल्याण महामार्गावर रविवारी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Ahmednagar Kalyan Highway triple accident

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 8:12 AM IST

Updated : Dec 18, 2023, 10:17 AM IST

पुणे Ahmednagar Kalyan Highway triple accident - रविवार हा घातवार ठरला आहे. अहमदनगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन आठ जण जागीच मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात ओतूरवरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकपने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये पाच पुरुष एक महिला तर दोन लहान मुले यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडला.

भाजीपाला घेऊन पीकअप ओतूर बाजूकडून कल्याण बाजूकडे जात असताना अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी अपघात झाल्याची तात्काळ माहिती पोलिसांना दिली आहे. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ स्थानिकांच्या बरोबर मदत कार्य सुरू केलं. या अपघातात एकूण मृतांची संख्या आठ आहे. यात पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातात एकूण पाच लोकांची ओळख पटली आहे. मृत्यू झालेल्या तीन प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम चालू आहे.

असा झाला तिहेरी अपघात- भाजीपाला घेऊन पीकअप ही ओतूर बाजूकडून कल्याण बाजूकडे जात होती. तर कल्याण बाजूकडून ओतूरकडे रिक्षा येत होती. या दोन्ही वाहनांचा अपघात डिंगोरे व पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर कल्याण हायवे रोडजवळ असणारे पेट्रोलपंपा समोर झाला. रिक्षा तिच्या ट्रॅकवरून जात असताना पिकअपनं रिक्षाच्या ट्रॅकवर येवून धडक दिल्यानं अपघात झाला. या अपघाता रिक्षामधील चालक व 2 प्रवासी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप ही घसरत जाऊन कल्याणच्या बाजूकडून येणाऱ्या ट्रकवर धडकली. या अपघातात पिकमधील चालक कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी मुलगा, मुलगी व मागे बसलेला हमाल यांचा मृत्यू झाला.

रिक्षामधील मृत लोकांची नावे खालील प्रमाणे- 1) नरेश नामदेव दिवटे वय 66 वर्ष (रिक्षा चालक)रा. पेडे परशुराम तालुका चिपळूण जि.रत्नागिरी.

अपघातातील ओळख पटलेल्या पीकअपमधील व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे

1) गणेश मस्करे वय.30 वर्ष (चालक मयत)

2) कोमल मस्करे वय.25 वर्ष (चालकाची पत्नी)

3) हर्षद मस्करे वय.4 वर्ष (चालकाचा मुलगा)

4) काव्या मास्करे वय. 6 वर्ष (चालकाची मुलगी) सर्व रा. मड.तालुका जुन्नर जिल्हा पुणे.

5) अमोल मुकुंदा ठोखे (राहणार जालना)

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले- अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी अपघातस्थळी मदत कार्य केले आहे. दरम्यान, आठ जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी ओतूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.

हेही वाचा-

  1. ओव्हरटेक करताना धावत्या कारवर कोसळला ट्रक; भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू
  2. मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्त दुचाकीस्वाराचे वाचवले प्राण; जखमी प्रवाशाला रुग्णालयात केले दाखल

Last Updated : Dec 18, 2023, 10:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.