ETV Bharat / state

कोरोना उद्रेक : बारामतीत ७ सप्टेंबरपासून १४ दिवसांसाठी कडकडीत जनता कर्फ्यू - बारामती कोरोना अपडेट

रुग्णसंख्या कमी होत असताना बारामतीत पुन्हा कोरोनाने रौद्र रूप धारण केल्याने नागरिकांंसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. बारामतीत मागील तीन दिवसात तीनशेहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या पाच महिन्यांतील हा उच्चांक आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Sep 4, 2020, 10:55 PM IST

बारामती (पुणे) - शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना प्रसार कमी करण्याच्या दृष्टीने बारामतीत पुन्हा एकदा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी दिनांक 7 ते २१ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्यात येत आहे.

बारामती

रुग्णसंख्या कमी होत असताना बारामतीत पुन्हा कोरोनाने रौद्ररूप धारण केल्याने नागरिकांंसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. बारामतीत मागील तीन दिवसात तीनशेहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या पाच महिन्यांतील हा उच्चांक आहे. यामुळे प्रशासनावर मोठा ताण आला आहे. अजूनही बारामतीत शिथिलता ठेवल्यास कोरोनाचा आणखी मोठ्या प्रमाणावर उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ न दवडता बारामतीतील कोरोनाचे वाढते प्रस्थ रोखण्याच्या दृष्टीने नाईलाजास्तव प्रशासनाला पुन्हा एकदा बारामतीत लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला असून जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील चौदा दिवसांसाठी बारामती प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. लॉकडाऊनच्या या दुसऱ्या टप्प्यात बारामती तालुक्याच्या सर्व सीमा बंद राहणार आहेत.

हेही वाचा - 'कंगनाच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही, तिने मुंबईला शहाणपण शिकवू नये'

हा चौदा दिवसांचा लॉकडाऊन असून या कालावधीत सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांनी त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू व साधनांचा आत्ताच साठा करून घ्यावा. प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बारामतीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चौदा दिवसांच्या जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात येत आहे. नागरिकांनी या 14 दिवसांच्या कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन बारामती नगरपालिका नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.