पुणे - खुलेआम एकमेकांना चुंबन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणींना विरोध केल्याने ज्येष्ठ महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. पुण्यातील सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला, असून यात ज्येष्ठ महिलेचा दात पडला आहे.
याप्रकरणी, एका 64 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून 4 तरुणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी या सिंहगड रस्ता परिसरातील कृपा फाउंडेशनमध्ये केअरटेकर म्हणून कामकाज पाहतात. 19 फेब्रुवारी रोजी चार तरुणी तेथे आल्या होत्या. यातील दोन तरुणी बाहेर ठेवलेल्या बाकड्यावर एकमेकांना खुलेआम चुंबन करण्याचा प्रयत्न करत होत्या.
फिर्यादीने केली तक्रार
फिर्यादी महिलेने त्यांना रोखले. व त्याची तक्रार कृपा फाउंडेशनच्या मॅनेजरकडे केली होती. याचाच राग आल्याने या चारही तरुणींनी एकत्र येऊन फिर्यादी महिलेला मारहाण केली होती. लाथाबुक्क्यांनी, रॅकेटने त्यांना बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून आमची तक्रार कुठेही द्यायची नाही असे म्हणत धमकी दिली. या सर्व झटापटीत फिर्यादीचा एक दात तुटला होता. त्यानंतर फिर्यादीने मुंबईत जाऊन उपचार घेतले आणि परत पुण्यामध्ये आल्यानंतर याविषयी तक्रार दिली. सिंहगड रस्ता पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
हेही वाचा - इंधनावरील कराचे २५ लाख कोटींचे काय केले? अधिवेशनात महागाईप्रश्नी जाब विचारणार - मल्लिकार्जून खर्गे