ETV Bharat / state

खासगी वाहतूकदारांकडून दरवाढ; प्रवासी संख्या वाढल्याने निर्णय

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव गावी जाणे पसंत केले आहे. अचानक गावाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांनी दरवाढ केली आहे.

Bus Fare News
बस दर वाढ
author img

By

Published : Mar 19, 2020, 12:13 PM IST

पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. आयटी कर्मचाऱ्यांना 'वर्क फॉर्म होम' सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून अनेक विद्यार्थी आणि नागरिक गावाकडे जात आहेत. अचानक गावाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांनी दरवाढ केली आहे.

खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या दारात वाढ

खासगी बस कंपन्यांनी 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत दरवाढ केली आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, ही दरवाढ शिवशाहीसारख्या सरकारी बसच्या तुलनेत कमीच असल्याचे बस व्यावसायिक सांगत आहेत. वाढत्या डिझेलच्या दरांमुळेही काही प्रमाणात दरवाढ झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 45 वर; पुणे, मुंबईसह रत्नागिरीतही आढळला रुग्ण

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव गावी जाणे पसंत केले आहे. काही दिवसांपूर्वी खासगी बसमध्ये प्रवासी नसल्याने शुकशुकाट दिसत होता. मात्र, आता सुट्टी जाहीर होताच खासगी बसचे ऑनलाईन बुकिंग फुल्ल झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.