ETV Bharat / state

आषाढी एकादशी : भक्तांच्या गर्दीने दुमदुमली पुण्यातील प्रतिपंढरपूर असलेली 'विठ्ठलवाडी' - पासोड्या विठोबा मंदिर

कपाळी चंदनाचा टिळा, मुखी विठुनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. संपूर्ण सिंहगड रस्ता यानिमित्ताने गर्दीने फुलून गेला आहे.

पुण्यात आषाढी एकादशीनिमित्त भक्तांच्या मंदिराच्या बाहेर रांगा लागल्या आहेत.
author img

By

Published : Jul 12, 2019, 9:24 AM IST

पुणे - अनेक भाविकांना आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता येत नाही, म्हणून भाविक प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिराला भेट देतात. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलवाडी परिसरात जणू साक्षात पंढरी अवतरली, असे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी भक्तांच्या गर्दीने दुमदुमले

कपाळी चंदनाचा टिळा, मुखी विठुनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. संपूर्ण सिंहगड रस्ता यावेळी गर्दीने फुलून गेला आहे. या आनंदसोहळ्यात मोठ्या संख्येने आबालवृद्ध सहभागी झाले आहेत. याशिवाय पुणे शहरातील आणि उपनगरातील विठ्ठल मंदिरांचा परिसरही पहाटे पाच वाजेपासून विठ्ठलभक्तांच्या गर्दीने गजबजलेला आहे.

नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर, पासोड्या विठोबा मंदिर, भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर, नवी पेठेतील विठ्ठल मंदिर अशा विविध मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत.

Intro:अनेक विठ्ठलभक्तांना आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता येत नाही..असे भाविक प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिराला भेट देतात. आजही विठ्ठलवाडी परिसरात जणू साक्षात पंढरी अवतरली असे वातावरण निर्माण झोके आहे..कपाळी चंदनाचा टिळा, मुखी विठुनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.
संपूर्ण सिंहगड रस्ता यानिमित्ताने गर्दीने फुलून गेला आहे..या आनंदसोहळ्यात मोठ्या संख्येने आबालवृद्ध सहभागी झाले आहेत.Body:याशिवाय पुणे शहरातील आणि उपनगरातील विठ्ठल मंदिरांचा परिसरही पहाटे पाच वाजल्यापासून विठ्ठलभक्तांच्या गर्दीने गजबजलेला आहे..नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर, पासोड्या विठोबा मंदिर, भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर, नवी पेठेतील विठ्ठल मंदिर अशा विविध मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.