पुणे: सायबर चोरट्यांकडून आता राजकीय व्यक्तींना टार्गेट करून त्यांना थेट धमकी देत फसवले जात आहे. पुण्यातील पर्वती मतदार संघातील आमदार माधुरी मिसाळ यांना एका रुग्णाला मदत मिळावी म्हणून त्यांची फसवणूक करण्यात आले. त्यांनतर भाजपचे नेते महापालिका सभागृह नेते गणेश बिडकर, मनसे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या मुलांला, त्यांनतर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागण्यात आली. त्यांनतर काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना देखील खंडणी मागण्यात आली. अशा पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील राजकीय व्यक्तींना सायबर चोरट्यांकडून टार्गेट केले जात आहे.
मुलाला फसविण्याचा प्रयत्न: याबाबत मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे म्हणाले की, सायबर चोरांची एवढी हिम्मत वाढली आहे की ते आता थेट धमक्या देऊ लागले आहे. हा प्रकार सध्या खूपच वाढत चालला आहे. प्रतिष्ठित लोकांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेऊन त्यांना धमकवण्यात येत आहे. हे प्रमाण सध्या वाढत आहे आणि माझ्या मुलाबाबत देखील असाच प्रकार घडला होता. पोलिसांच्या सतर्कतेने आरोपीला अटक झाली आहे; पण मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. पोलिसांनी यात लक्ष घालावे आणि मुख्य आरोपीला अटक करावी असे यावेळी मोरे म्हणाले.
सायबर पोलिसांचे आवाहन: पुणे शहरांमध्ये गेल्या वर्षभरात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सामान्य नागरिकांसोबतच राजकीय नेते मंडळींचा यामध्ये सहभाग आहे. यामध्ये नागरिकांची व्हिडिओ किंवा पिनच्या माध्यमातून फसवणूक करण्यात येते. त्यानंतर पैशांची मागणी केली जाते. मात्र, अशा प्रकारची फसवणूक झाल्यानंतर नागरिक घाबरून जातात आणि याबाबतची तक्रार पोलिसांकडे करत नाही. महिनाभरात अशा राजकीय प्रतिष्ठित व्यक्तींच्या चार केसेस सायबर पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. नागरिकांनी अश्या कोणत्याही याला न घाबरून जाता तात्काळ पोलिसांशी संपर्क करायला हवे, अस आवाहन यावेळी सायबर डीसीपी श्रीनिवास घाडगे यांनी केले आहे.
तिच्या बदनामीचा प्लॅन? राजकीय नेत्यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणी पुण्यातील खंडणी विरोधी पथकाने एकाला अटक केली आहे. इम्रान शेख (वय अंदाजे २५, रा. कोंढवा) असे या आरोपीचे नाव आहे. ज्या पद्धतीने म्हणजेच आरोपीने राजकीय व्यक्तींना टार्गेट केले आहे. आरोपी सगळ्यांना एका मुलीच्या नावाने खंडणी मागत होता. आरोपी इम्रानला एका मुलीसोबत लग्न करायचं होते. मात्र मुलीने लग्नाला नकार दिला. त्याचा राग मनात धरून या मुलाने त्या मुलीची बदनामी करण्याच्या हेतूने हा प्लॅन आखला अशी प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा: Maharashtras love for Ayodhya : ठाकरे घराण्याने जपले नाते उद्धव, आदित्यनेही केले दौरे पाहुया महाराष्ट्राचे अयोध्या प्रेम