ETV Bharat / state

Kasba Chinchwad By Elections Result : कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकीचा विजय - पृथ्वीराज चव्हाण - रवींद्र धंगेकर विजयी

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. या पोटनिवडणूकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या आहेत. या निकालनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील केले आहेत.

Political Reactions on Kasba Chinchwad By Elections Result
कसबा चिंचवड निवडणुकीच्या निकालावर राजकीय प्रतिक्रिया
author img

By

Published : Mar 2, 2023, 1:49 PM IST

Updated : Mar 2, 2023, 6:43 PM IST

पुणे : कसब्यामध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. सर्व शक्ती, युक्ती, धन शक्ती भाजपने पणाला लावली होती. पण शेवटी जन शक्तीचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते घरात बसून प्रचार करतात. पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखून दिली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आम्ही मागे असलो तरी तिथे बंडखोरी झाली आहे. नाहीतर ती जागा ही सहज आम्हाला भेटली असती, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया - कसबा पोटनिवडणुकीचा निकाल हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या एकीचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

संग्राम थोपटे यांची प्रतिक्रिया - कसबा निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हू इज धंगेकर असे म्हटले होते. यावर आता काँग्रेसचे आमदार तसेच या पोटनिवडणुकीचे निरीक्षक संग्राम थोपटे यांनी विधान करत हू इज धंगेकर म्हणणाऱ्या लोकांनाच आता जनतेने दाखवून दिले आहे, असे म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया - कसबा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला विजयाचा विश्वास होता. जनशक्तीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघात धनशक्ती उभी केली होती. आपलाच विजय होईल असा फाजील आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाला होता. मात्र, हाच फाजील आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाला नडला. कसबा पेठ मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय मिळवून देत हा विजय महाराष्ट्रातील भविष्यातील चित्र प्रदर्शित करणारा निकाल असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाने जातीधर्माचे कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला. नेहमीच निवडणुकांमध्ये जाती धर्माचे कार्ड वापरण्याचा फार्मूला भारतीय जनता पक्षाचा आहे. मात्र, त्यांच्या या फॉर्मुल्याला पुण्यातील मतदार बळी पडले नाहीत. कसबा पेठ मधील निर्णय हा लोकशाही सुदृढ करणारा निर्णय असल्याचेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया - कसबा मतदारसंघात लागलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल हा फार बोलका आहे, अशा शब्दात या निवडणुकीच्या निर्णयाचे स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते जनतेला मान्य नाही. कसबा पेठ मतदारसंघात आमचा विजय झाला. वाढती महागाई, महाराष्ट्रातले निघून चाललेले उद्योग यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार आहेत याची जाणीव जनतेला पूर्णपणे असल्यामुळेच कसबा पेठ येथे मतदारांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

पिंपरीत सुजाण मतदारांचे मतदान : पिंपरी चिंचवडमध्ये सुजाण मतदारांनी मतदान केले. शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार प्रचंड बहुमताने विजय झाला आहे. धर्माधर्माच्या युद्धात धर्माच्या बाजूने मतदान केले आहे. सत्याच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आणि भाजपला विजयी केले आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

कसबामध्ये आमचा विजय : कसब्यामध्ये झालेला विजय फार बोलका आहे. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते जनतेला मान्य नाही. कसबामध्ये आमचा विजय झाला आहे. वाढती महागाई आहे. महाराष्ट्रातले निघून चाललेले उद्योग, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग संदर्भात जी कमिटी बनवण्यात आली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे

अजित पवार यांची प्रतिक्रिया - कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत एक जागेवर विजय तर एक जागेवर पराजय महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाला. त्यामुळे या निवडणुकीचे निकाल म्हणजे थोडी गम थोडी खुशी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन आम्ही आर्धी लढाई जिंकलो होतो. ते तळागाळात काम करणारे कार्यकर्ता आहेत. ते दौंड तालुक्यातील स्थानिक असून, मागील २० वर्ष पुण्यात राहात आहेत. आम्ही सर्व मित्र पक्षांची एकजूट बांधण्यात यशस्वी ठरलो. त्यामुळेच कसबा पेठ येथे महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला असं विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले आहेत.

सत्ताधारी पक्षाने सर्व यंत्रणांचा वापर केला : रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो. तळागाळात काम करणारा कार्यकर्ता. ते दौंड तालुक्यात नागील २० वर्ष पुण्यात राहत आहेत. आम्ही सर्व मित्र पक्षांची एकजूट बांधण्यात यशस्वी ठरलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री तिथे होते. सर्व गोष्टींचा वापर सत्ताधाऱ्यांनी तिथे केला. तेथील मतदाराने सुद्धा सांगितले की, तिथे काय परिस्थिती होती, पण जनतेला आम्हाला कौल दिला. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आमचा विजय झाला असता, राहुल कलाटे याला मी सतत सांगितले, पण त्यांनी ते ऐकले नाही. कारण तिथून तो उभा राहावा म्हणून काही जण सतत प्रयत्नात होते. नाहीतर दोन्ही जागी आमचा विजय झाला असता. पण सत्ताधारी पक्षाने सर्व यंत्रणांचा वापर केला. राहुल व नाना काटे या दोघांची मते बघितली तर ती भाजप उमेदवारापेक्षा जास्त आहेत, असे अजित पवार म्हणाले.

थोडी खुशी थोडा गम : यातून एक सिद्ध होते, जर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन व्यवस्थित रणनीती आखली विशेष करून कोण उमेदवार जनतेच्या पसंतीचा आहे. यावर लक्ष दिले तर आम्ही जनतेच्या मनात पोहचू. ज्या प्रकारे हे शिंदे - फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे ते जनतेच्या पसंतीचे नाही हे सिद्ध होते, असे म्हणत थोडी खुशी थोडा गम, ही प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

जनतेचे आभार : देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांची वीज कापायला लागले आहेत. अधिवेशन सुरू असेपर्यंत शेतकऱ्यांची वीज कापली जाऊ नये, असे सांगितले असताना त्यांची वीज तोडली जात आहे. गॅस व वीज संदर्भात जनतेला दिलासा द्यावा, अशी आम्ही मागणी केली पण सरकार त्यावर तयार नाही. भाजपने पुण्यामध्ये पोटनिवडणुकीसाठी भाजपने पैशाची लयलूट केली. हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. कसबामध्ये भाजपचा दावा जनतेने फोल ठरवला आहे. रवींद्र धनगेकर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे मी जनतेचे आभार मानतो. सत्तापक्षच सभागृहात गदारोळ करत आहे. शेतकरी, वीज, गॅस दरवाढ या बाबत सरकारला काही पडलेले नाही आहे. हे सरकार उद्योगपती साठी चालत आहे. शेतकरी विरोधी धोरण सुरू आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

हेही वाचा : Kasba Bypoll Result: कसबा विधानसभा पोटनिवडणूक; काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी, भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव

Last Updated : Mar 2, 2023, 6:43 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.