पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे मत व्यक्त करताना भाजपवर तीव्र टीका केली. भाजपनी जेवढी बदनामी राज्यपाल महोदय यांच्या हातून करून घ्यायची होती. ते करून घेण्याचे काम त्यांनी केले आहे. असे त्यांना वाटत असेल म्हणून राज्यपाल यांना त्या पदावरून हटविण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्या पद्धतीने महापुरुषांचे अपमान केला आहे. ते या राज्यातील जनता विसरणार नाही. राज्याची बदनामी करण्यासाठी असा बायस्ट राज्यपाल भाजपने मुद्दामून बसविला होता. असे यावेळी नाना पटोले म्हणाले.
म्हणून राजीनामा मंजूर : नाना पटोले पुढे म्हणाले की, जो काही सर्वे आता येत आहे. त्यात 38 खासदार महाविकास आघाडीचे निवडून येणार आहे. यात मोठा वाटा राज्यपाल यांचा आहे. हे लक्षात आल्यावर भाजपने नरेंद्र मोदी यांनी त्यांची खुर्ची कायम राहावी यासाठी त्यांनी राज्यपाल यांचा राजीनामा मंजूर केला आहे, असे देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.
राज्यपाल यांची हकालपट्टी : नाना पटोले म्हणाले की, राज्यपाल यांची हकालपट्टी व्हावी अशी आम्ही मागणी केली होती. पण राजीनामा मंजूर केला म्हणजे त्याचा सन्मान केला. आता सन्मान करणे हे भाजपला किती महागात पडेल. हे महाराष्ट्राची जनता दाखवून देणार आहे. महाराष्ट्राच्या अपमानाचा बदला कसा घेतला जाईल ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान राज्यपालांच्या खुर्चीवर बसून राज्यपाल करत होते. त्यावेळेस जनतेने काँग्रेस पक्षांनी या पद्धतीचा आवाज उचलला आणि राष्ट्रपती महोदयांना आम्ही कळवले. राष्ट्रपती महोदयांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातले नाही. अशा पद्धतीचे चित्र होते.
रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल : रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. यावर नाना पटोले म्हणाले की, नवीन राज्यपाल हे माझे मित्र आहेत. आम्ही एकत्र काम केले आहे. त्यांनी बायस्ट असू नये. सरकार चुकत असेल तर त्यांनी सरकारची कान उघडणी करावी. जनतेला न्याय मिळवून द्यावा. सरकारने जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा. अशी अपेक्षा यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केली. तसेच त्यांच्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान वाढावा. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राज्य आहे. हा संदेश आणि महाराष्ट्राचा विकास बरोबर व्हावे असे देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.
देर आये पर दुरूस्त आये - सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, ज्या व्यक्तीने महापुरुषांचा अपमान केला त्या व्यक्तीला आज फायनली त्यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा म्हणजे सरकार देर आये पर दुरूस्त आये. तसेच नवीन राज्यपाल यांना शुभेच्छा आणि त्यांच्याबरोबर गेली दहा वर्ष मी एकत्र काम केलेला आहे. अतिशय सुसंस्कृत असे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी काम केलेले आहे. ज्या गोष्टी याआधी झालेले आहे ते अतिशय दुर्दैवी आहे, असे यावेळी सुप्रिया सुळे म्हणाले.
राज्यपाल पदाची गरीमा नष्ट केली - पृथ्वीराज चव्हाण
राज्यपालांवर कधीही टीका-टीपण्णी होत नाही. कोणी आक्षेप घेत नाही. परंतु, भगतसिंह कोश्यारी त्याला अपवाद ठरले. त्यांनी राज्यपाल पदाची गरीमा नष्ट केली, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. तसेच इतके दिवस राज्यपालांचा राजीनामा का स्वीकारला नाही, याचे उत्तर केंद्रातील मोदी सरकारने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात काम करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करून वाद ओढवून घेतले. राज्यपालांवर कुणीही टीका करत नाही. आक्षेप घेत नाही. यास ते अपवाद ठरले. त्यांचे निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरले. त्यामुळे त्यांना वादात पडण्याची हौस होती की सतत चर्चेत राहिले पाहिजे, याचा हव्यास होता, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.