पुणे - राज्यातील सात साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे नुसार बिले दिले नाही, म्हणून राज्य साखर आयुक्तालयाने राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आरआरसीनुसार नाेटीस बजावल्या आहेत.
एफआरपी देणारे हे कारखाने - ७० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण १४५०३.५९ लाख आरआरसी रक्कम थकवली आहे. ( RRC has issued a notice to the Political Leaders ) यात प्रामुख्याने राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आल्याचे दिसून येते.
नाेटीस बजावलेले साखर कारखाने खालीलप्रमाणे - या सात कारखान्यांमध्ये सर्व संचालक हे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी निगडित नेते आहेत. त्यामुळे, राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यावर नोटीस दिल्या आहेत. नाेटीस बजावलेले साखर कारखाने खालीलप्रमाणे -
- साेलापूर - सहकार शिराेमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर - आरआरसी रक्कम ३६७४.९० लाख ( संबंधित राजकीय नेते - कल्याणराव काळे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
- पुणे- राजगड सहकारी साखर कारखाना लिं. भाेर- आरआरसी रक्म २५९१.६९ लाख ( संबंधित राजकीय नेते - आमदार संग्राम थोपटे - काँग्रेस)
- बीड - अंबेजाेगाई सहकारी साखर कारखाना, अंबेजोगाई आरआरसी रक्कम ८१४.१५ ( संबंधित राजकीय नेते - माजी मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
- बीड - वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी - आरआरसीसी रक्कम - ४६१५.७५ लाख ( संबंधित राजकीय नेते - माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजप)
- उस्मानाबाद - जयलक्ष्मी शुगर प्राे.नितळी - आरआरसी रक्कम - ३४०.६९ लाख ( संबंधित राजकीय नेते - विजयकुमार दांडनाईक, भाजप)
- सातारा - किसनवीर ससाका भुईंज, सातारा - आरआरसी रक्कम - ४११.९१ लाख ( संबंधित राजकीय नेते - आमदार मकरंद पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
- अहमदनगर - साईकृपा साखर कारखाना, हरिडगाव, अहमदनगर - आरआरसी रक्कम -२०५४.५० लाख - ( संबंधित राजकीय नेते - आमदार बबनराव पाचपुते,भाजप
हेही वाचा - Arjun Khotkar : दिल्लीवारीनंतर अर्जुन खोतकर जालन्यात दाखल; शिवसेना की शिंदे गट? पाहा, काय म्हणाले...