ETV Bharat / state

#तिढा पायी वारीचा : बंडातात्या कराडकर आणि त्यांचे समर्थक पोलिसांच्या ताब्यात

कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या तोंडावर येऊन ठेपली आहे. म्हणूनच यंदा ही राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

police taken custody to bandatatya karadkar over payi wari demand alandi
बंडातात्या कराडकर आणि त्यांचे समर्थक पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : Jul 3, 2021, 9:12 AM IST

Updated : Jul 3, 2021, 1:15 PM IST

आळंदी (पुणे) - ह. भ. प. बंडातात्या कराडकर हे पायी वारी करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. सध्या त्यांना आळंदी-पुणे रोडवरील संकल्प गार्डन मंगल कार्यालय येथे त्यांच्या समर्थकांसह पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे इतर समर्थक स्थानबद्ध केलेल्या ठिकाणाच्या समोर टाळ मृदुंगाच्या गजरात ठिय्या मांडून बसले आहेत.

बंडातात्या पायी वारीच्या भूमिकेवर ठाम

कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या तोंडावर येऊन ठेपली आहे. म्हणूनच यंदा ही राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असे कराडकरांनी जाहीर केले. त्यानुसार पहाटे पाचच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. या सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तिथे पोहचले. मात्र, पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं.

बंडातात्या कराडकर स्थानबद्ध

पायी वारी नसल्याने वारकरी संप्रदायाकडून नाराजी व्यक्त -

गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे आषाढी एकादशी सोहळा प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात आला होता. त्यावेळीही मानाच्या पालख्या एसटीच्या माध्यमातून पंढरपुरात आणण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळी 20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पायीवारी दिंडीची परवानगी घ्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदाय, महाराज मंडळी, भारतीय जनता पार्टी तसेच तसेच इतर संघटनांकडून राज्य सरकारकडे करण्यात आली होती. मात्र, पायीवारी दिंडी दरम्यान वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर वारीत सहभागी होतील. यामुळे पांडुरंगाची होणारी आषाढी एकादशी सोहळा प्रतीकात्मक करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या पायी दिंडी संदर्भात महाराज मंडळींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - VIDEO : बंडातात्या कराडकर यांची सरकारला काळजी आहे म्हणूनच हे निर्बंध - नीलम गोऱ्हे

माऊलींच्या आषाढीवारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या २२ वारकऱ्यांना कोरोनाची लागण

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी मंदिरातून शुक्रवारी (दि.२ जुलै) रोजी मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत प्रस्थान होणार आहे. त्यामुळे आळंदीत राज्यभरातून आलेल्या २०४ वारकऱ्यांची काल आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आळंदीचे नागराध्यक्ष, देवस्थान मधील एक कर्मचाऱ्यासह तब्बल २२ वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आळंदीत एकच खळबळ उडाली आहे. कोरोना चाचणी तापसणीपूर्वी हे वारकरी ज्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी त्वरित आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाखरी येथून पायी वारी करण्याची परवानगी -

राज्य सरकारकडून आषाढी वारी सोहळा हा गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिकात्मक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आळंदी व देहू संस्थांच्या पालख्यांसोबत 100 जणांना परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित आठ मानाच्या पालख्यांना 50 सदस्य वारीसाठी बसच्या माध्यमातून घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. यासाठी राज्य सरकारकडून 20 एसटी बसेची सोय करण्यात आली आहे. मानाच्या पालख्या वाखरी येथे आले असता, दीड किलोमीटर पायी दिंडी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आषाढी एकादशीला 195 महाराज मंडळींना मुखदर्शनाची सोय केली जाणार आहे. या सर्वांमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

हेही वाचा - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा संपन्न

आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिर राहणार बंद -

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून राज्य सरकार जे कोरोना नियम घालून देणार आहे. या नियमाप्रमाणे आषाढी एकादशी सोहळा पार पडणार आहे. आषाढी वारी दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, परंपरेनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 24 तास खुले ठेवण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. तसेच शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले आहे.

Last Updated : Jul 3, 2021, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.