बारामती (पुणे) - बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री केल्याप्रकरणी बारामतीतील दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. बारामतीतील जुनी मंडई येथील आशिष ट्रेडर्स व तेजस जनरल स्टोअर्स या दोन दुकानांवर कारवाई करत दुकान मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्लास्टिक, नायलॉन सिंथिटिक मांजामुळे पक्षी व मनुष्यास दुखापत होत असल्याने उच्च न्यायालयाने व पर्यावरण विभागाने मांजावर बंदी घातली आहे. या हानिकारक मांजावरील दुकानात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत मांजा गुंडाळण्यासाठी वापरण्यात येणारी दोन इलेक्ट्रॉनिक मशीन, मांजाचे अठरा बंडल, असा 11 हजार 400 रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, उमेश दंडीले, सहायक फौजदार निकम, जगदाळे, माळी, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, अकबर शेख, कोकणे, नूतन जाधव, अजित राऊत, दशरथ इंगोले, यांनी केली. या गुन्ह्याचा तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे करत आहेत.
हेही वाचा - बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना काळातल्या कामाची नोंद इतिहासात होईल - उपमुख्यमंत्री