पुणे : उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुणे दौरा आहे. त्याचबरोबर आजच त्यांच्या गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी कार्यालय आमचेच असल्याचे म्हटले. तर प्रशांत जगताप यांनी पक्ष कार्यालय आपल्या नावावर करून राकॉं पक्षाला फसवले असल्याचासुद्धा आरोप त्यांनी केला. त्यानंतर प्रशांत जगताप यांनीसुद्धा हे आरोप चुकीचे असल्याचे सांगत, आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.
काय म्हणाले प्रशांत जगताप? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत असल्याचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आहेत. मी त्यांच्याच पक्षाचा अध्यक्ष आहे. हे कार्यालय आमचंच असून अजित पवार यांच्या गटाचे गेल्या 40 वर्षांत पक्षासाठी आणि कार्यालय उभारण्यासाठी, जागा बघण्यासाठी, बांधण्यासाठी काही योगदान नाही. त्यांनी दावा करणे चुकीचे आहे. माझा मित्रत्वाचा सल्ला आहे की, त्यांनी नवीन कार्यालयाची जागा पहावी आणि आपले काम करावे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
राकॉंचे 50 नगरसेवक 'नॉट रिचेबल': राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी ताकद कुणाकडे याविषयी बोलतानासुद्धा प्रशांत जगताप म्हणाले की, आज रोजी नगरसेवक नसल्यामुळे तो आकडा सांगता येत नाही. पण आज देखील 50 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे सोमवारी ते चित्र स्पष्ट होईल, की किती नगरसेवक आहेत.
नगरसेवक कोणासमोर मांडतील भूमिका? 50 नगरसेवक लॉटरीचे पण असल्याने पुणे शहरात चर्चा होत असून माजी नेत्यांची वाईट अवस्था आहे. नगरसेवकांची अशी परिस्थिती सध्या शहरात असून ते नगरसेवक नेमकी आपली भूमिका उद्या अजित पवार समोर मांडतील की शरद पवार यांच्यापुढे मांडतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता पुण्यातसुद्धा अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी हे कार्यालय प्रशांत जगताप यांनी आम्हाला द्यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर हा वाद वाढत आहे; म्हणून आता शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी दिसत आहे.
हेही वाचा: