पुणे - पोलीस खात्यात काम करत असताना एखादा छंद जोपासणं खर तर अवघड काम असतं. परंतु सर्व अडचणींवर मात करत पुणे पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणाऱ्या प्रेमा पाटील यांनी सौंदर्य स्पर्धेचा किताब पटकावला आहे. 2019 च्या 'रिनिंग मिसेस इंडिया' या सौंदर्य स्पर्धेत विजेत्या ठरल्या आहेत.
एका पोलीस दलातील व्यक्तीसाठी कवायत मैदान ते रॅम्प वॉकपर्यंतचा प्रवास किती खडतर असू शकतो याची कल्पना आपण करू शकतो. हाच प्रवास करत असताना अडचणींसोबत केलेला सामना प्रेमा पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितला आहे.