ETV Bharat / state

दाम्पत्याकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; वाहन चोरी प्रकरणातील चौकशीसाठी घेऊन जाताना घडला प्रकार - couple beaten police pune

सचिन पवार गुन्हे शाखेच्या युनिट सहामध्ये नेमणुकीस आहेत. युनिट सहाचे पथक वाहन चोरीचा तपास करत होते. यादरम्यान, एका गुन्ह्यात उद्धव भोसले व त्यांच्या पत्नीला संशयित म्हणून काल सकाळी पवार हे त्यांना गाडीतून कार्यालयात घेऊन जात होते.

police constable beaten by couple pune
पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण
author img

By

Published : Jul 13, 2021, 11:01 AM IST

Updated : Jul 13, 2021, 2:02 PM IST

पुणे - वाहन चोरी प्रकरणातील संशयित दाम्पत्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या दाम्पत्याने गुन्हे शाखेच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याच्या हाताला चावा घेतला. याप्रकरणी उद्धव एकनाथ भोसले (वय 35) याला अटक करण्यात आली आहे. तर पत्नीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पवार असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

घटनास्थळाची दृश्ये

पोलिसांना धक्काबुक्की -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पवार गुन्हे शाखेच्या युनिट सहामध्ये नेमणुकीस आहेत. युनिट सहाचे पथक वाहन चोरीचा तपास करत होते. यादरम्यान, एका गुन्ह्यात उद्धव भोसले व त्यांच्या पत्नीला संशयित म्हणून काल सकाळी पवार हे त्यांना गाडीतून कार्यालयात घेऊन जात होते. यावेळी दोघांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करत त्यांना धक्काबुक्की केली. तसेच, त्यांना शिवीगाळ केली. तर उद्धव यांच्या पत्नीने त्यांच्या हातातील फळीने वाहतूक वॉर्डनला मारहाण केली.

तसेच, उद्धव याने फिर्यादी यांच्या हाताचा मनगटाचा चावा घेऊन त्यांना जखमी केले, असे पोलीस सचिन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करत उद्धव यांना अटक केली आहे.

हेही वाचा - अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूवर आली शेती करण्याची वेळ, महाराष्ट्रीयन असल्याने त्रास होत असल्याचा केला आरोप

Last Updated : Jul 13, 2021, 2:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.